चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

 चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

चंद्रपूर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील दिग्गज भाजप नेते राज्याचे वनमंत्री आणि चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला. आज सकाळी परमेश्वराचे आशीर्वाद घेऊन त्यांनी गांधी चौकात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत सभेला संबोधित केले. रॅलीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचत त्यानी अर्ज सादर केला. आपण नेहमीच विकासाचे राजकारण केले असून जातीपातीच्या राजकारणाला इथला मतदार कधीही भुलत नाही त्यामुळे विकासवेगी राजकारणामुळेच जनता आपला मतरूपी आशीर्वाद आपल्याला देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. Sudhir Mungantiwar filed his candidature in Chandrapur

ML/ML/PGB
26 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *