मराठवाडा हादरला भूकंपाच्या धक्क्याने

नांदेड, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठवाड्यातील नांदेड, परभणी , हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी भूकंपाचे मोठे धक्के जाणवले असून त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. भूकंपाचा केंद्र बिंदू असलेल्या ठिकाणापासून 60 किलो मिटर अंतरापर्यंत भूकंप झाला.
यात परभणी जिल्ह्यात ही अनेक ठिकाणी आवजासह सौम्य धक्का जाणवला ,पण यात कुठेही नुकसान झाल्याची माहिती मिळालेली नाही, सदर धक्क्याची नोंद भूकंप मापक केंद्रात 4.5 आणि 3.6 अशी झाली आहे. घेतलेल्या माहिती नुसार कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही.
नांदेड येथे अनेक भागात गुरुवारी सकाळी 6 वाजून 8 ते 9 मिनिटाच्या दरम्यान दहा सेकंद 4.2 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू आखाडा बाळापूर पासून 15 किलोमीटरवर दाखवला जात आहे. हिंगोली जिल्ह्यातही भूकंपाचा सौम्य धक्का बसला.
आज सकाळी ०६.०८ आणि ०६.०९ वाजेदरम्यान हिंगोली, वसमत, औंढा आणि कळमनुरी तालुक्यातील काही गावांमध्ये भूगर्भातून आवाज आणि सौम्य धक्के जाणवले आहेत. सदर धक्क्याची नोंद भूकंप मापक केंद्रात ४.५ आणि ३.६ अशी झाली आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. मात्र नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. नांदेड शहर तसेच अर्धापूर, मुदखेड, नायगाव, देगलूर, बिलोली या तालुक्यातून आज दिनांक २१ मार्चला सकाळी 06:09 आणि 06:19 मिनिटांनी दोन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, मात्र सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने अधिकृतरित्या दिलेल्या वृत्तानुसार या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केल वर अनुक्रमे 4.5 आणि 3.6 अशी नोंदविण्यात आलेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील जांब गावात असून नांदेड आणि परभणी जिल्ह्यात या भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती नियंत्रण कक्षास प्राप्त झालेली आहे. नांदेड जिल्ह्यात जाणवलेले धक्के सौम्य स्वरूपाचे असून कुठेही नुकसान झालेले नाही.
ML/ML/SL
21 March 2024