मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी
मुंबई, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदावरून इकबाल्सिंह चहल यांची गच्छंती झाल्यानंतर त्या जागी अखेर आज मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, निवडणूक आयोगाने त्यावर शिक्कमोर्तब केल्यानंतर हा आदेश काढण्यात आला आहे.
चहल यांना पदावरून हटविण्याची सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारला तीन वेळा दिल्यानंतरही सरकारने त्यांची बदली केली नव्हती , चहल यांच्यासह पी वेलारसू आणि अश्विनी भिडे यांचा पालिकेतील कार्यकाल तीन वर्षांहून अधिक झाल्याने त्यांची बदली करण्यात यावी असे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. मात्र निवडणूक जाहीर झाल्यानंतरच आयोगाने आपल्या अधिकारात या तिघांना कार्यभार सोडण्यास फर्मावले होते. वेलारासू आणि चहल अद्याप नियुक्तीच्या प्रतीक्षेत असून भिडे यांना मेट्रो महामंडळाच्या महा संचालक पदावर नेमण्यात आले आहे.
चहल यांच्या जागी कोणाची नियुक्ती करावी यासाठी सरकारने गगराणी यांच्यासह तीन अधिकाऱ्यांची नावे आयोगाला पाठविली होती, त्यानुसार आज आयोगाने मुंबईत गगराणी, ठाण्यात सौरभ राव तर नवी मुंबई महापालिका आयुक्त पदी कैलास शिंदे यांची नियुक्ती करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले , आज संध्याकाळी गगराणी यांनी आपला कार्यभार स्वीकारला आहे.
ML/ML/SL
20 March 2024