एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माना जन्मठेप

 एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माना जन्मठेप

मुंबई दि.19(एम एमसी न्यूज नेटवर्क) : लखन भय्या बनावट चकमक प्रकरणात एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना मुंबई उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. राम नारायण गुप्ता उर्फ लखन भय्या हा गँगस्टर अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा जवळचा हस्तक होता. मुंबईत तो छोटा राजनसाठी काम करत होता. प्रदीप शर्मा आणि त्यांच्या पथकाकडून लखन भय्याला वाशी या ठिकाणाहून उचलण्यात आलं. त्यावेळी त्याच्याबरोबर अनिल भेडा हा व्यक्ती होता. याच दिवशी संध्याकाळी मुंबईतल्या वर्सोवा या ठिकाणी असलेल्या नाना-नानी पार्कमध्ये लखन भय्याचं एन्काऊंटर करण्यात आलं.

२००६ मध्ये झालेल्या लखन भय्या एन्काउंटर प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर ती चकमक बनावट असल्याचं एसआयटी चौकशीत उघड झालं होतं. याप्रकरणी मुंबई पोलीस दलांतील १३ अधिकारी आणि पोलिसांना अटक करण्यात आली होती. त्यात प्रदीप शर्मांचाही समावेश होता. त्यानंतर २००८ मध्ये त्यांना निलंबितही करण्यात आलं होतं. मात्र न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती.

लखन भय्या प्रकरणात एकूण १६ याचिका आल्या होत्या. या प्रकरणी ८ नोव्हेंबर २०२३ रोजी निकाल राखून ठेवला होता. आज मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती गौरी गोडसे आणि रेवती डेरे यांच्या खंडपीठाने चकमक फ्रेम प्रदीप शर्मांना दोषी ठरवत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

SW/ML/SL

19 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *