पक्षीप्रेमी सुनील कल्ले यांनी घरातच साकारली ‘चिमणी बाग’

 पक्षीप्रेमी सुनील कल्ले यांनी घरातच साकारली ‘चिमणी बाग’

अकोला, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एकेकाळी प्रत्येक घरात असणारा चिमण्यांचा किलबिलाट आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.मात्र अकोल्यातील पक्षीमित्र सेवानिवृत्त तलाठी सुनील कल्ले यांच्या अंगनात दररोज हजारो चिमण्यांचा किलबिलाट पक्षांची भरलेली शाळा पहायला मिळते.कल्ले दांपत्याने चिऊताईसाठी तयार केलेल्या “चिमणी बागेमुळे” अंगणांतून नामशेष होत असलेल्या चिमण्या पुन्हा अंगणात परतल्याचे सुखद चित्र या चिमणी बागेत दिसत आहे.

कल्ले परिवाराने घराच्या अंगणात चिमण्यांसाठी बाग तयार केली असून मागील 15 वर्षापासून दररोज हजारो चिमण्या,मुनिया, बुलबुल,
सुगरण या सारख्या हजारो पक्षांची दाणा पाण्याची सोय केल्याने पक्षांचा किलबिलाट परत आला आहे.बागेत अन्न पाण्याची सोय झाल्याने हजारो चिमण्या बागेत दिवसभर मुक्तपणे संचार करून रात्र झाली की आपआपल्या घरट्यात परत जातात हे नित्यक्रमाचे झाले आहे.

शहरात अनेक ठिकाणी पक्ष्यासाठी जलपात्र लावली जातात मात्र त्याकडे फारसे लक्ष न दिल्याने जलपात्र झाडाला टांगूनही पक्ष्यांसाठी त्यात पाणीच नसल्याने पक्ष्यांचा भ्रमनिरास होतो.
मात्र सुनील कल्ले यांचा परिवार रोज न चुकता पक्ष्यांसाठी अन्न आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात त्यासाठी रोज त्याना 10 ते 15 किलो धान्य लागते.हे कार्य दररोज नित्यनेमाने केले जाते.

पक्ष्यासाठी कुठेही धान्य टाकताना ते नेहमी मातीवर किंवा प्लास्टिकच्या पात्रात टाकावे कारण घरांच्या छतावर अथवा सिमेंटच्या भिंतीवर टाकलेले धान्य खाताना पक्ष्यांची चोच तुटण्याची भीती अधिक असते.कडक ठिकाणी टाकलेले दाणे खाताना पक्षांची चोच तुटून रक्तस्त्राव झाल्याने अनेक पक्षांना आपला जीव गमवावा लागतो.

आज अनेक पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर असताना चिऊताईचा किलबिलाट जिवंत ठेवण्यासाठी अश्याप्रकारच्या चिमणी बागेची निर्मिती घराच्या परिसरात किंवा छतावर केल्यास चिमण्यांचा किलबिलाट नामशेष होणार नाही, हे निश्चित….Bird lover Sunil Kalle created ‘Chimni Bagh’ at home.

ML/ML/PGB
19 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *