१०२ महिलांनी केला एकाच वेळी ड्रोन उडवण्याचा विक्रम
भोपाळ, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
देशातील महिलांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना आमलात आणत आहे. यांपैकी नमो ड्रोन दीदी योजना हा भारत सरकारचा महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.ग्रामीण भारतातील शेतीशी निगडित महिलांच्या सक्षमिकरणासाठी केंद्र सरकारने ‘नमो ड्रोन दिदी योजना’ सुरू केली आहे. या योजनेंतर्गत बचत गटातील महिलांना कीटकनाशके आणि खते फवारणीसाठी ड्रोन पायलट म्हणून प्रशिक्षण देण्यात आले आहे.याच पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशातील १०२ ड्रोन दिदींनी एकाचवेळी ड्रोन उडविण्याचा विक्रम केला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पल्सेस रिसर्च सेंट्र, फंदा येथे झालेल्या या कार्यक्रमात मध्य प्रदेशातील ८९ आणि उर्वरित महाराष्ट्रातील महिला ड्रोन पायलटचा समावेश होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या योजनेंतर्गत मध्य प्रदेशातील ८९ आणि उर्वरित महाराष्ट्रातील महिलांना ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या सर्व ड्रोन पायलट महिलांना मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षणाचा कालावधि संपल्यानंतर आज १०२ ड्रोन दीदींनी एकाचवेळी ड्रोन उडवत विक्रम केला आहे. शेतीशी संबंधित ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्यासाठी ड्रोन दीदी योजना राबविली जात आहे. ३० नोव्हेंबर २०२३ ला या योजनेची सुरूवात करण्यात आली. बचत गटांशी संबधित महिलांना या योजनेंतर्गत शेतीकामासाठी लागणाऱ्या ड्रोन पायलटचे प्रशिक्षण देण्यात येते. यासाठी महिलांना पाच दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणानंतर परिक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. त्यानंतरच या ड्रोन पायलटना प्रमाणपत्र देण्यात येते.
या योजनेचे अनेक फायदे आहेत. महिलांना सक्षम करणे ही या योजनेचा या प्राथमिकता आहे. या योजनेमुळे महिलांना रोजगारासह आर्थिक सक्षण होण्यास मदत होते. याशिवाय शेतीतील उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढून शेतीत होणारा खर्च कमी होऊ शकतो. तसेच या योजनेमुळे महिलांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध होणार आहे. महिला ड्रोन पायलटला १० ते १५ गावांचा एक क्लस्टर तयार करून ड्रोन देण्यात येतील. यापैकी एका महिलेची ‘ड्रोन सखी’ म्हणून निवड केली जाईल. त्यानंतर निवडलेल्या ड्रोन सखींना १५ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाईल आणि त्यांना दरमहा १५ हजारांचे मानधन दिले जाईल.
SL/ML/SL
11 March 2024