TATA समूह इथे उभारणार देशातील पहिला मेगा फॅब कारखाना

 TATA समूह इथे उभारणार देशातील पहिला मेगा फॅब कारखाना

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टाटा समूहाने गुजरातमधील ढोलेरा येथे १६० एकर जमीन संपादीत केली आहे. या ठिकाणी ९१ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह देशातील पहिला मेगा फॅब कारखाना उभारण्यात येणार आहे. तर CG पॉवरला एटीएमपी (असेंबलिंग, टेस्टिंग, मार्केटिंग आणि पॅकेजिंग ऑफ सेमीकंडक्टर) युनिट स्थापन करण्यासाठी साणंदमध्ये २८ एकर जमीन देखील देण्यात आली आहे. या कारखान्यावर CG पॉवर 7,600 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे गुजरात सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या दोन्ही प्रकल्पांची पायाभरणी 13 मार्च रोजी अनेक मोठे नेते आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. या प्रकल्पांना काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाली होती.

गुजरात राज्य इलेक्ट्रॉनिक्स मिशनचे संचालक मनीष गुरवानी म्हणाले, ‘टाटा यांना ढोलेरा येथील जमिनीसाठी वाटप पत्र देण्यात आले आहे आणि सीजी पॉवरला साणंदमधील जमिनीसाठी वाटप पत्र देण्यात आले आहे. आम्ही भारत सेमीकंडक्टर मिशनकडून प्रकल्पासाठी औपचारिक मंजुरी पत्राची वाट पाहत आहोत. यानंतर गुजरात सरकार आपल्या बाजूने मंजुरी पत्र देईल. केंद्र आणि राज्य सरकार प्रकल्पाच्या एकूण खर्चाच्या सुमारे 70 टक्के प्रोत्साहन देतील.

2013 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी धोलेराच्या विकासासाठी महत्त्वाकांक्षी योजनेची पायाभरणी केली होती. अहमदाबादपासून ते 110 किलोमीटर अंतरावर आहे. प्रकल्पाचा पहिला टप्पा 22.5 चौरस किलोमीटरमध्ये पसरला असून पूर्ण झाल्यानंतर तो सिंगापूर शहरापेक्षा मोठा असेल.

गुजरात सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, धोलेरा येथील 8 फॅब कारखान्यांसाठी पुरेसे पाणी (नर्मदा कालव्यातून) आहे. उच्च दर्जाची वीज देखील आहे. जी जवळच्या इतर राज्यांपेक्षा 40 टक्के स्वस्त आहे. त्यापूर्वी गुजरात सरकारने वेदांत-फॉक्सकॉनच्या फॅब आणि डिस्प्ले प्रकल्पासाठी ढोलेरा येथे 1.54 लाख कोटी रुपयांच्या अंदाजे गुंतवणूकीसह 600 एकर जमीन दिली होती. मात्र तो प्रकल्प सुरू होऊ शकला नाही.

SL/KA/SL

9 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *