बँक कर्मचाऱ्यांना मिळणार १७ टक्के पगारवाढ

मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरातील बँक कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात १७ टक्के वाढ करण्याच्या करारावर काल युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन आणि इंडियन बँक असोसिएशनच्या प्रतिनिधींनी अंतिम स्वाक्षऱ्या केल्यात. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या या करारावर काल यावर अंतिम स्वाक्षऱ्या झाल्यात.या करारामध्ये १२ सार्वजनिक क्षेत्रातील बँकांयासह १० खाजगी बँका आणि 3 विदेशी बँकांचा समावेश आहे. अशा एकूण १५ बँकांमधील ७ लाख बँक कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
पगारवाढीसह यामध्ये ५ दिवसांचा आठवडा करण्यावर देखील चर्चा झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीमुळे बँकांच्या व्यवस्थापकांना दरवर्षी १२ हजार ४४९ कोटींचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे. सदर करार हा ऑक्टोबर २०२७ पर्यंत लागू असेल. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा विचार देखील या करारात करण्यात आला आहे.
बँक कर्मचारी (Bank Employee) अनेक दिवसांपासून पगारवाढीची मागणी करत होते. आता ही मागणी पूर्ण झाली आहे. कर्मचाऱ्यांनी या करारात ५ दिवसांच्या आठवड्याची देखील मागणी केली होती. या मागणीला तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. आतापर्यंत बँकेतील कर्मचाऱ्यांना दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवार सुट्टी होती. ही सुट्टी आता सर्व आठवड्यांना मिळार आहे.सदर करार निर्णय सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.
SL/ML/SL
9 March 2024