राज्यातील लोकसभेच्या जागा वाटपाबाबत दोन्ही बाजूने अद्याप निर्णय नाहीच

 राज्यातील लोकसभेच्या जागा वाटपाबाबत दोन्ही बाजूने अद्याप निर्णय नाहीच

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभेची निवडणूक अगदी तोंडावर आलेली असतानाही सत्तारूढ महायुती आणि विरोधी महा विकास आघाडीचे आपसातील जागा वाटप अद्याप रखडलेलेच आहे. दोन्ही बाजूने चर्चेचे गुऱ्हाळ अद्यापही रोज सुरूच आहे.

महायुतीचे जागा वाटप अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यात मार्गी लावण्यात यश येईल असे वाटत असतानाच त्यावर कोणताही अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीला गेले असून तिथे
जागावाटप संदर्भात दिल्लीत महायुतीची बैठक होत आहे.
महायुतीमध्ये समन्वय आहे.सर्व काही ठीकठाक आहे असे मुख्यमंत्री शिंदे आज म्हणाले असले तरी लोकसभा
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात जागावाटपावरून भाजप, शिवसेना आणि
राष्ट्रवादी या महायुतीत पेच निर्माण झाला आहे.

व्यवहार्य जागांची मागणी करा,
असं भाजपकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सांगण्यात आले आहे. तसेच महायुतीच्या काही विद्यमान खासदारांची तिकिटेही
कापली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राजधानी नवी
दिल्लीत जागावाटपाबाबत महत्त्वाची बैठक
पार पडणार आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री
एकनाथ शिंदे हे कोल्हापूर विमानतळावरूनच
थेट दिल्लीला रवाना झाले.

दुसरीकडे महा विकास आघाडीचे जागावाटप पंधरा जागांवरून रखडलेलेच आहे, त्यावर अनेक चर्चेच्या फेऱ्या झाल्या आहेत मात्र तोडगा काही निघत नाही. त्यातच वंचित बहुजन आघाडीला घ्यावे की न घ्यावे , जागा दिल्या तरी ती सोबत राहीलच याची शक्यता कमी अशा संभ्रमात ते आहेत.

वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी आज आघाडीला थेट पत्र पाठवून आम्हाला दोनच जागा मिळत असल्याचे सांगत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वंचित ला नेमक्या किती जागा द्याव्यात यावर आघाडीत एकमत झालेले नाही. तर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या मध्ये एकमेकांच्या जागा पदरात पाडून घेण्यासाठी चढाओढ सुरू आहे. Neither side has yet decided on the allocation of Lok Sabha seats in the state

ML/KA/PGB
8 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *