महिला दिनानिमित्त ११० महिलांचा “वुमन्स सायलॉथॉन “मध्ये सहभाग

नाशिक, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतिक महिला दिनानिमित्त आज नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन आणि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने “वुमन्स सायक्लोथॉन 2024” चे आयोजन करण्यात आले. यामध्ये 110 महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
सकाळी ठीक साडेसहा वाजता सर्व सायकलिस्ट महिला अनंत कानेरे मैदान येथे जमल्या. सर्वांना ती फिट तर कुटुंब फिट असा संदेश देणारा गुलाबी रंगाचा टी-शर्ट परिधान करण्यासाठी देण्यात आला. वननेस डान्स स्टुडिओ चे डॉ. अजय भन्साळी यांनी सौम्य संगीताच्या तालावर उपस्थित सर्वांचे वार्म अप सेशन घेतले. सौ छाया बैजल मॅडम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून राईड ला सुरुवात झाली. दि.1 मार्च ते 7 मार्च दरम्यान नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन च्या वतीने महिलांना सायकल प्रशिक्षण शिबिरा चे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 65 महिला सहभागी झाल्या होत्या.
अनेक नवीन महिला देखील आत्मविश्वासाने सायकल चालवायला पण शिकल्या आणि आज त्यादेखील या रॅलीमध्ये सहभागी झाल्या. “हर हर महादेव “, “ती फिट तर कुटुंब फिट” ,”नारी शक्तीचा विजय असो”, “सायकल चालवा आरोग्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी” अशा घोषणा मार्गात दिल्या. सर्वांनी शिस्तबद्ध दोनच्या रांगेमध्ये सायकलिंग केली .ही रॅली सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली . रॅलीचा मार्ग ,अनंत कान्हेरे मैदान – मायको सर्कल- हॉटेल ग्रीन व्हू सिग्नल – कॅनडा कॉर्नर – कॉलेज रोड- भोसला सर्कल – जेहान सर्कल – जुना गंगापूर नाका – मॅरेथॉन चौक – जुनी पंडित कॉलनी- राजीव गांधी भवन – रामायण बंगला – गोल्फ क्लब मैदान असा होता रॅली नंतर झुंबा सेशन झाले . सायकल प्रशिक्षण शिबिर यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या महिलांचा सत्कार प्रशस्तीपत्र देऊन करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी अतिरिक्त आयुक्त सेवा विभाग, म.न.पा. नाशिकच्या सौ स्मिता झगडे मॅडम उपस्थित होत्या. वयाच्या चाळीशी नंतर देखील सायकलिस्ट महिलांचा उत्स्फूर्तपणे सहभाग बघून विशेष कौतुक केले. त्यांनी पंढरपूर सायकल वारीत सहभागी होण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन चे संस्थापक हरीश बैजल , इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया मॅनेजिंग कमिटी चेअरमन सी.ए .संजीवन तांबुलवाडीकर, वेस्टर्न इंडिया चार्टर्ड अकाउंटंट स्टुडंट असोसिएशन नाशिक शाखेचे चेअरमन सी ए विशाल वाणी, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे माजी अध्यक्ष राजेंद्र वानखेडे ,किशोर माने, उपाध्यक्ष अरुण पवार, डॉ.मनीषा रौंदळ, सचिव संजय पवार, संचालक एस पी आहेर, माधुरी गडाख, प्रवीण कोकाटे ,सुरेश डोंगरे, बजरंग कहाटे, होनेस्टी इंडिया स्टोअर चे किरण बागुल हे मंचावर उपस्थित होते.
गाडी चालवण्याचे प्रशिक्षण आत्तापर्यंत ऐकले होते, पण सायकल चालवण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनने पुढाकार घेतल्याबद्दल हरीश बैजल सर यांनी विशेष कौतुक केले. महिलांना सायकल प्रशिक्षण देण्यासाठी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन च्या पुरुष सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले आणि आपला अमूल्य वेळ देऊन प्रशिक्षण दिले त्याबद्दल त्यांचा टॉवेल व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच सायकलिस्ट सखीने दुसऱ्या नवीन सखीला सायकल शिकवल्याबद्दल माजी अध्यक्ष राजेंद्र वानखेडे यांच्या हस्ते विशेष भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
ML/KA/SL
8 March 2024