‘बार्टी’ च्या धर्तीवर मातंग समाजासाठी होणार ‘आर्टी’ ची स्थापना

मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मातंग समाजाच्या विकासासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अण्णा भाऊ साठे संशोधन केंद्र स्थापन करण्यासंदर्भात समाजाची मागणी होती. त्या अनुषंगाने या अधिवेशनात अर्थमंत्र्यांनी अण्णा भाऊ साठे संशोधन केंद्र स्थापनेची घोषणा केली. मातंग समाजाच्या विकासासाठी हे फार मोठे पाऊल ठरणार आहे.अनुसूचित जातीमधील समाजासाठी बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र (बार्टी) स्थापन झाले होते. त्याच धर्तीवर अण्णा भाऊ साठे संशोधन केंद्राची (आर्टी) स्थापना झाल्याने मातंग समाजाला दिलासा मिळाला. अनुसूचित जातीमधील समाजासाठी बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र (बार्टी) स्थापन झाले होते. त्याच धर्तीवर अण्णा भाऊ साठे संशोधन केंद्राची (आर्टी) स्थापना झाल्याने मातंग समाजाला दिलासा मिळाला. यामुळे मातंग समाजाच्या प्रगतीसाठी ही स्थापना मैलाचा दगड ठरणार आहे.
शासनाने स्थापन केलेले बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र (बार्टी) अनुसूचित जातीमध्ये असलेल्या ५९ जातींसाठी काम करते. परंतु, या केंद्राच्या स्थापनेपासून एकाच जातीला याचा जास्त लाभ मिळत असल्याचे मातंग समाजाचे म्हणणे होते. त्यामुळे ‘बार्टी’च्या धर्तीवर ‘आर्टी’ची स्थापना करावी, अशी मागणी मातंग समाजाची होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राला ३२५ कोटी रुपये अर्थसहाय्य मिळते.त्यामध्ये अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण, व्यवसाय, प्रशिक्षण यांसह विद्यार्थी व समाजाच्या प्रगतीसाठी हा निधी खर्च करण्यात येतो. परंतु, बार्टीच्या स्थापनेपासून अनुसूचित जातीमधील ५९ जातींना समान लाभ मिळत नसल्याचा आरोप होता.
SL/KA/SL
7 March 2024