लोकसभेसाठी भाजपची १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

नवी दिल्ली, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज असलेल्या सत्ताधारी भाजपने आज 16 राज्यातील 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचं नाव नाही. यामध्ये सर्वाधिक उत्तर प्रदेशमधील ५१ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपाचे पहिले उमेदवार असून ते त्यांच्या वाराणसी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. भाजपाने पहिल्या यादीत २८ महिलांना उमेदवारी दिली आहे.
दिल्लीतल्या लोकसभेच्या आठपैकी पाच जागांवर भाजपाने त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. प्रवीण खंडेलवाल यांना चांदणी चौकातून, मनोज तिवारींना उत्तर-पूर्व दिल्ली, बांसुरी स्वराज यांना मध्य दिल्ली, कमलकित सहरावत यांना पश्चिम दिल्ली आणि रामवीर बिधुडी यांना दक्षिण दिल्लीतून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे.
विनोद तावडे यांनी भाजपच्या उत्तर प्रदेशमधील ५१, पश्चिम बंगालमधील २०, मध्य प्रदेशमधील २४, गुजरातमधील १५, राजस्थानमधील १५, केरळमधील १२, तेलंगणामधील ९, आसाममधील ११, झारखंडमधील ११, छत्तीसगडमधील ११, दिल्लीमधील ५, जम्मू काश्मीरमधील २, उत्तराखंडमधील ३, अरुणाचल प्रदेशमधील २, गोव्यातील १, त्रिपुरामधील १, अंदमान निकोबारमधील १ आणि दिव-दमणमधील एका उमेदवाराच्या नावाची घोषणा केली.
SL/KA/SL
2 March 2024