FASTag KYC अपडेटला मुदतवाढ

 FASTag KYC अपडेटला मुदतवाढ

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) फास्टॅग केवायसी अपडेट साठी 29 फेब्रुवारी पर्यंत दिलेली मुदत आता वाढवली आहे. यापूर्वी अंतिम तारीख होती. ती मुदत आता 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. याचा अर्थ युजर्सना फास्टॅग केवायसीसाठी आणखी एक महिन्याचा वेळ मिळाला आहे. एनएचएआय (NHAI) वन व्हेईकल, वन फास्टॅग उपक्रमांतर्गत आता एका वाहनासाठी एक फास्टॅग असेल. हा फास्टॅग इतर कोणत्याही वाहनासाठी वापरता येणार नाही. पेटीएम फास्टॅग वापरकर्त्यांच्या संभाव्य समस्या लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने राष्ट्रीय महामार्गांवरील टोल पेमेंटमध्ये अडचण येऊ नये यासाठी केवायसी वेळेवर अपडेट करण्यास सांगितले आहे. तुम्ही 31 मार्चपर्यंत फास्टॅग केवायसी अपडेट न केल्यास तुमचे फास्टॅग खाते निष्क्रिय होऊ शकते.
केवायसी तपशील अपडेट करण्यासाठी वाहन मालकाला काही कागदपत्रे सादर करावी लागतील. यामध्ये वाहन नोंदणी प्रमाणपत्र, चालकाचा परवाना आणि पॅन किंवा मतदार ओळखपत्र समाविष्ट आहे. याशिवाय पत्त्याच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट आणि पासपोर्ट आकाराचे छायाचित्र आवश्यक आहे.

फास्टॅग केवायसी अपडेट करण्यासाठी तुम्हाला बँकेशी लिंक असलेल्या फास्टॅग वेबसाइटवर जावे लागेल. येथे नोंदणीकृत मोबाइल नंबर वापरून लॉग इन करा आणि प्राप्त झालेला ओटीपी भरा. यानंतर ‘माय प्रोफाइल’ विभागात जा आणि ‘केवायसी’ टॅबवर क्लिक करा. त्यानंतर आवश्यक माहिती भरल्यानंतर ‘सबमिट’ वर क्लिक करा. सर्वप्रथम ज्या बँकेने तुमचा फास्टॅग जारी केला आहे त्या बँकेच्या शाखेत जा. बँक तुम्हाला केवायसी फॉर्म देईल, तो भरा आणि सबमिट करा. हा फॉर्म भरण्यासोबतच तुम्हाला कागदपत्रेही सादर करावी लागतील. हा फॉर्म सबमिट केल्यानंतर बँक केवायसी तपशीलांची पडताळणी करेल आणि तुमचा फास्टॅग अपडेट करेल.

असे करा केवायसी अपडेट

  • fastag.ihmcl.com ला भेट द्या.- मुख्यपृष्ठावरील लॉगिन बटणावर क्लिक करा.- नोंदणीकृत मोबाइल नंबरसह लॉग इन करा जिथे तुम्हाला ओटीपी मिळेल.- मुख्यपृष्ठावरील ‘माय प्रोफाइल’ विभागात क्लिक करा.
  • ‘केवायसी स्टेटस’ वर क्लिक करा

SL/KA/SL

1 March 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *