मंत्रालयावर झोपडीधारकांचा संकल्प मोर्चा !

 मंत्रालयावर झोपडीधारकांचा संकल्प मोर्चा !

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : १९९५ साली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ४० लाख झोपडीधारकांना मोफत घर देण्याची घोषणा केली होती. मात्र अद्यापही या झोपडीधारकांचा प्रश्न प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर निवारा हक्क संघर्ष समितीच्या वतीने समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. संतोष सांजकर यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयावर झोपडीधारकांचा संकल्प मोर्चा काढण्यात येणार आहे. अशी माहिती मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बुधवारी दिली.

झोपडपट्टी पुनर्वसन योजने अंतर्गत झोपडी धारकांना ५०० चौरस फुटाचे घर देण्यात यावे. साबळे नगर, कुर्ला येथील रेल्वेच्या जमिनीवर मागील ५० ते ६० वर्षांपासून राहात असलेल्या झोपडी धारकांचे त्वरित पुनर्वसन करण्यात यावे. लाल डोंगर, चेंबूर येथील मागील १५ वर्षांपासून बेघर असलेल्या रहिवाशांना न्याय मिळवून देण्यात यावा.

अशोक नगर, अली बहादुदूर चाळ, मुलुंड येथील सुगी डेव्हेलपर्सच्या माध्यमातून तेथील रहिवाशांसाठी पुनर्वसनाच्या किमान दोन इमारती बनवाव्या. चंदन नगर, पवई रोड, विक्रोळी, या ठिकाणी मागील १४ वर्षांपासून रखडलेला प्रकल्प मार्गी लावण्यात यावा.विकासकाच्या आर्थिक फायद्यासाठी गिरिजाबाई चाळ, नाहूर येथील ७० ते ८० झोपडी धारकांना हेतुपुरस्सर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमधून वगळण्यात आले त्यांचे एसआरए पुनर्वसन करण्यात यावे.

पंचशील नगर, चेंबूर येथील विकासक चैतन्य मेहता व जतीन मेहता यांच्या बेकायदेशीर कामाचा होत असलेला सुळसुळाट नियंत्रित करण्यात यावा.सूर्योदय गृहनिर्माण सोसायटी, गोवंडी येथील रखडलेला प्रकल्प मार्गी लावण्यात यावा. आंबिवली-कल्याण याठिकाणी नेपच्युन स्वराज्य व नेपच्युन रामराज्य या प्रकल्प मध्ये मागील १४ वर्षांपासून, आपल्या हक्काच्या घरापासून वंचित ठेवलेल्या २५०० लोकांना न्याय मिळवून द्यावा.

मुंबई मधील वर्षानुवर्षे रखडलेले एसआरए मधील प्रकल्प सरकारने हाती घेऊन तेथील रहिवाशांना न्याय मिळवून द्यावा. झोपडपट्टी पुनर्वसन योजने अंतर्गत असलेल्या जमिनीचे समान वाटप करण्यासंबंधीचा धोरणात्मक नियम पारित करावा , जेणेकरून विकासकाला रहिवाशांची भरमसाठ जमीन लाटता येणार नाही आणि रहिवाशांचे राहण्यासारखे पुनर्वसन होऊ शकेल. मुंबई मधील रेल्वे लगतच्या सर्व झोपडीधारकांचे एसआरए योजने अंतर्गत पुनर्वसन करण्यात यावे. अशी मागणी ॲड. संतोष सांजकर यांनी यावेळी केली.

Resolution of the slum dwellers on the Ministry!

ML/KA/PGB
28 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *