मुंबई सारखा कायदा राज्यात शक्य नाही, सरकारने केले स्पष्ट

 मुंबई सारखा कायदा राज्यात शक्य नाही, सरकारने केले स्पष्ट

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातल्या महापालिकांमध्ये मुंबई महानगरपालिकेसारख्या कायद्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही असं आज मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत स्पष्ट केलं. अन्य महानगपालिकांच्या तुलनेत मुंबईची लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचा कायदा अन्य महानगरपालिकांमध्ये लागू करणं शक्य होणार नाही असं ते म्हणाले.

मुंबई महानगर पालिका क्षेत्रात मालमत्ता कराचा भुर्दंड पडू नये यासाठीचं विधेयक आज विधानपरिषदेत मंजूर करण्यात आलं , या विधेयकावरील चर्चे दरम्यान ते बोलत होते. राज्यातल्या सर्व महापालिकांचा एकसमान कायदा असावा मुंबईलाच वेगळा कायदा का ? ही मागणी सरकारनं पूर्ण करावी अशी मागणी विरोधी पक्षातल्या अनेक सदस्यांनी लावून धरली मात्र सामंत यांनी यावेळी बोलताना आम्ही जी आश्वासनं देतो ती पूर्ण करतो असा टोला लगावला.

वरळीत सिंगापुरच्या धर्तीवर मुंबई आय निर्माण करण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली होती , मात्र ती घोषणाच राहिली मात्र या घोषणेची आम्ही पूर्तता करू असं सामंत म्हणाले. भारतरत्न लता मंगेशकर हयात होत्या तेव्हा पंडित दिनानाथ मंगेशकरांच्या नावानं आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय सुरु करण्याची घोषणा केली होती . महाविकास आघाडी सरकारच्या काळात लता दीदींनी यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र त्यांचं निधन झाल्यानं त्या संगीत विद्यालयाचे नाव लता दिनानाथ मंगेशकर ठेवावं लागलं मात्र त्यानंतर लता मंगेशकर यांच्या नावाने ‘एक’ पुरस्कार दिला गेला त्यामुळे हे संगीत विद्यालय करायचं नाही असा अलिखीत नियम महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाला ,असं सांगत पण ते लतादीदींचं स्वप्न आम्ही पुर्ण केलं याकडे सामंत यांनी लक्ष वेधलं. A law like Mumbai is not possible in the state, the government made it clear

ML/KA/PGB
28 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *