पंतप्रधानांनी जाहीर केली गगनयान मोहिमेवर जाणाऱ्या अंतराळवीरांची नावं

 पंतप्रधानांनी जाहीर केली गगनयान मोहिमेवर जाणाऱ्या अंतराळवीरांची नावं

तिरुवनंतपुरम, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय अवकाश संशोधन संस्थेत ( ISRO) आता देशाच्या विज्ञान क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा गगनयान मोहिमेची तयारी सुरु आहे. या मोहिमेद्वारे अंतराळात जाणाऱ्या अंतराळवीरांची नावे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमधील तिरुवनंतपुरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरला (VSCC) भेट देत सुमारे 1800 कोटी रुपयांच्या तीन अंतराळ पायाभूत सुविधा प्रकल्पांचे उद्घाटन केले आणि देशातील पहिल्या मानवयुक्त गगनयान अंतराळ मोहिमेच्या तयारीचा आढावा घेतला.त्यांच्यासोबत इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथही उपस्थित होते. पंतप्रधानांनी गगनयान मोहिमेवर पाठवल्या जाणाऱ्या अंतराळवीरांची नावे जाहीर केली आणि त्यांना अ‍ॅस्ट्रोनॉट्स विंग्ज दिले. गगनयान मोहिमेवर ज्या अंतराळवीरांना पाठवले जाईल त्यात ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर, ग्रुप कॅप्टन अजित कृष्णन, ग्रुप कॅप्टन अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशू शुक्ला यांचा समावेश आहे.

यावेळी पंतप्रधान म्हणाले की, काही काळापूर्वी देशाला पहिल्यांदा 4 गगनयान प्रवाशांची ओळख झाली. ही फक्त 4 नावे किंवा 4 लोक नाहीत, या चार शक्ती आहेत ज्या 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा अवकाशात घेऊन जाणार आहेत. 40 वर्षांनंतर एक भारतीय अंतराळात जाणार आहे पण यावेळी वेळ आमची आहे, काउंटडाऊन देखील आमचा आहे आणि रॉकेटदेखील आमचे आहे.

पंतप्रधान म्हणाले- प्रत्येकाने उभे राहून आपल्या अंतराळवीरांना अभिवादन करावे अशी माझी इच्छा आहे. प्रत्येक राष्ट्राच्या विकासाच्या प्रवासात असे काही क्षण येतात जे वर्तमान आणि येणाऱ्या पिढ्यांची व्याख्या करतात. आज भारतासाठी हा क्षण आहे, आपली आजची पिढी खूप भाग्यवान आहे जिला जल, जमीन, आकाश आणि अवकाशातील ऐतिहासिक कार्यांची कीर्ती मिळत आहे. काही काळापूर्वी देशाला प्रथमच 4 गगनयान प्रवाशांची ओळख झाली. ही फक्त 4 नावे किंवा 4 लोक नाहीत, या चार शक्ती आहेत ज्या 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षा अवकाशात घेऊन जाणार आहेत. 40 वर्षांनंतर एक भारतीय अंतराळात जाणार आहे पण यावेळी वेळ आमची आहे, उलटगणतीदेखील आमची आहे आणि रॉकेटदेखील आमचे आहे.गेल्या वर्षी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर तिरंगा फडकवणारा भारत पहिला देश ठरला. आज शिव-शक्ती पॉइंट संपूर्ण जगाला भारताच्या क्षमतेची ओळख करून देत आहे. पंतप्रधान म्हणाले- 2035 पर्यंत भारताचे अंतराळात स्वतःचे स्पेस स्टेशन असेल. या स्पेस स्टेशनच्या मदतीने भारताला अंतराळातील अज्ञात विस्ताराचा अभ्यास करता येणार आहे. अमृत ​​कालच्या या कालावधीत, भारतीय अंतराळवीर आपल्याच रॉकेटमधून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरतील.

गगनयान मोहीम २०२५ मध्ये प्रत्यक्षात येण्याची अपेक्षा आहे. ‘टीव्ही-डी१’मध्ये सुधारित विकास इंजिनाचा समावेश केलेला असून त्याच्या पुढील भागात ‘क्रू मोड्यूल’ आणि ‘क्रू एस्केप सिस्टिम’ ही उपकरणे बसविण्यात आली आहेत. हे यान ३४.९ मीटर उंच आहे आणि त्याचे वजन ४४ टन आहे.

SL/KA/SL

27 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *