अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतपिकांचे नुकसान

वाशिम, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काल रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीटीमुळे वाशीम जिल्ह्यातील शेवती, पेडगाव, वनोजा परिसरातील शेतीसह नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरावरची टीन पत्रे उडाल्याने घरामध्ये असलेले सामान आणि सोयाबीन भिजून ओले झाले आहे. तसेच शेतामध्ये असलेले गहू, हरभरा, ज्वारी संत्रा फळबागेसह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला असून, शासनाने याचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.
SL/KA/SL
27 Feb. 2024