पर्यावरण संवर्धनासाठी दांपत्याने सोडली मुंबई

 पर्यावरण संवर्धनासाठी दांपत्याने सोडली मुंबई

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :वास्तुविशारद श्रीनिवास आणि त्यांची पत्नी डॉक्टर रश्मी वरखंडकर यांनी नेहमीच मुंबईतील आलिशान जीवनशैली स्वीकारली आहे. मात्र, ते आता रायगडच्या डोंगररांगांमध्ये बांबूच्या घरात राहून पर्यावरणपूरक जीवन जगण्यासाठी शेती आणि पशुपालन करत आहेत.

भौतिक सुखासाठी पर्यावरणावर घाला नको. सिमेंट काँक्रीटच्या घरांवर लाखो रुपये खर्च करणेही गैर असल्याचे वास्तुविशारद श्रीनिवास मानतात. साध्या बांबूघरात राहूनदेखील आनंदाने जगता येते असे त्यांचे म्हणणे होते.

केवळ संदेश न देता काँक्रीटची मुंबई त्यांनी कायमची सोडली. माणगावच्या डोंगरी भागात आंबर्ले गावच्या हद्दीतील उभारेवाडीत त्यांनी शेती घेतली. तेथील बांबूघरात २००९ पासून हा परिवार आनंदाने राहतो आहे. आयुष्यात कधीही काँक्रीटची वास्तुरचना साकारणार नाही, असा संकल्प श्रीनिवास यांनी सोडला आहे.

The couple left Mumbai for environmental protection

ML/KA/PGB
26 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *