पर्यावरणाचे कायदेशीर संरक्षणावर ठाणे काँलेजात राष्ट्रीय परिसंवाद !

 पर्यावरणाचे कायदेशीर संरक्षणावर ठाणे काँलेजात राष्ट्रीय परिसंवाद !

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आज व्हीपीएमएस लॉ कॉलेज आणि बांदोडकर ऑटोनॉमस कॉलेज ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पर्यावरण कायदेशीर संरक्षण आणि सुधारणांचे आव्हाने आणि भविष्य’ या विषयावर राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते, जिथे तज्ञांनी पाहुण्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला प्राध्यापक, विद्यार्थी आणि अभ्यागतांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

विद्या प्रसारक मंडळाचे टीएमसी विधी महाविद्यालय, बांदोडकर स्वायत्त विज्ञान महाविद्यालय व पॉलिटेक्निक महाविद्यालय यांनी संयुक्तपणे हा परिसंवाद आयोजित केला होता. मुबंई उच्च न्यायालय व राष्ट्रीय हरित अधिकरण चे माजी न्यायमूर्ती यु. डी. साळवी यांच्या हस्ते या परिसंवादाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय हरित अधिकरण चे एक्सपर्ट सदस्यांनी सखाेल मार्गदर्शन केले. यावेळी विप्रमंचे कार्यकारी सदस्य डॉ. महेश बेडेकर, माजी प्राचार्या डॉ. माधुरी पेजावर आणि तिन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीविद्या जया कुमार, डॉ. डि के नायक आणि डॉ. विंदा मांजरमकर उद्घाटनप्रसंगी सत्रासाठी उपस्थित होते.

साळवी यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात पर्यावरणाचा समतोल कसा राखला पाहिजे हे सांगून संबंधित कायद्यावर भाष्य केले. डॉ.कुलकर्णी यांनी आपल्या भाषणात पर्यावरण हा विषय आणि विविध विषयांमधील परस्परसंबंध यावर विवेचन केले. दुसऱ्या सत्रात राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची सामान्य कायदा, अधिकार क्षेत्र, खटला आणि प्रक्रिया यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.

यावर भाष्य करण्यासाठी पाच अधिवक्त्त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये रघुनाथ महाबल, अनिरुद्ध कुलकर्णी, मानसी जोशी व सुप्रिया डांगरे, सौरभ कुलकर्णी यांनी सहभाग घेवुन अनेक प्रश्नांची उत्तरे दिलीत. दुपारच्या जेवणानंतर तिसरे सत्र घेण्यात आले. यापुर्वी विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी नितीन वाघ यांनी त्यांच्या शोध पेपर सादर केला. डॉ. अजय देशपांडे यांचेही यावेळ व्याख्यान झाले. National Seminar on Legal Protection of Environment in Thane College!

ML/KA/PGB
25 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *