पंतप्रधानांच्या हस्ते राजकोटसह पाच AIIMS चे लोकार्पण

राजकोट, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुजरात दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या आरोग्य क्षेत्राला चालना देणाऱ्या विविध आरोग्य विषयक संस्था, उपक्रम आणि प्रकल्पांचे लोकार्पण केले. आरोग्य क्षेत्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. भारताला 5 नवीन AIIMS मिळाले.या संस्था भारताच्या विविध भागांमध्ये आरोग्यसेवा पायाभूत सुविधा मजबूत करतील.असे प्रतिपादन करत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 नवीन AIIMS संस्थांचे लोकार्पण केले. देशातील आरोग्य सेवेला बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पंतप्रधानांनी राजकोट (गुजरात), भटिंडा (पंजाब), रायबरेली (उत्तर प्रदेश), कल्याणी (पश्चिम बंगाल) आणि मंगलगिरी (आंध्र प्रदेश) या पाच एम्सचे राजकोट येथून लोकार्पण केले.
गुजरात दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदी यांनी राजकोट येथील सार्वजनिक , 48,100 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्राला समर्पण केले. या प्रकल्पांमध्ये आरोग्य, रस्ते, रेल्वे, ऊर्जा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, पर्यटन अशा महत्त्वाच्या क्षेत्रांचा समावेश आहे. याशिवाय, पंतप्रधान 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये उभारण्यात येणाऱ्या, 11500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या, 200 पेक्षा जास्त आरोग्य सेवा संबंधी पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्र समर्पण केल्या.
यावेळी पंतप्रधान इतर प्रकल्पांबरोबरच पुद्दुचेरी, कराईकल येथील जवाहरलाल पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेचे (JIPMER) वैद्यकीय महाविद्यालय आणि पंजाबमधील संगरूर, पदव्युत्तर वैद्यकीय आणि शैक्षणिक संशोधन संस्थेच्या (PGIMER) 300 खाटांच्या सॅटेलाईट सेंटरचे लोकार्पण केले. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी पुद्दुचेरी यनाम येथील जवाहरलाल पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (JIPMER) 90 खाटांच्या मल्टी स्पेशालिटी कन्सल्टिंग युनिटचे उद्घाटन करण्यात आले आहे.
तसेच चेन्नईतील नॅशनल सेंटर फॉर एजिंग; बिहार पूर्णिया येथील नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय; केरळ मधील अलप्पुझा येथील विषाणूशास्त्र राष्ट्रीय संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी) आणि तामिळनाडू, तिरुवल्लूर येथील क्षयरोग संशोधन राष्ट्रीय संस्था (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन ट्युबरक्युलोसिस (NIRT)) येथील नवीन एकत्रित क्षयरोग संशोधन सुविधा केंद्र या भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या (ICMR) 2 क्षेत्रीय एककाचे देखील पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झाले. तसेच पंतप्रधानांच्या हस्ते विविध आरोग्य प्रकल्पांची पायाभरणी होईल; यामध्ये पंजाबमधील फिरोजपूर येथे पदव्युत्तर वैद्यकीय आणि शैक्षणिक संशोधन संस्थेच्या (PGIMER) च्या 100 खाटांच्या सॅटेलाईट केंद्रासह दिल्लीतील आरएमएल रुग्णालय परिसरामध्ये वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम; इंफाळ येथील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (RIMS) मधील क्रिटिकल केअर ब्लॉक,; झारखंडमधील कोडरमा आणि दुमका येथील परिचारिका महाविद्यालय या प्रकल्पांचा समावेश आहे.
या व्यतिरिक्त, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि पंतप्रधान-आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियान (PM-ABHIM) अंतर्गत, पंतप्रधानांनी एकूण 115 प्रकल्पांपैकी काही प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी केली. यामध्ये पंतप्रधान-आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानातील (PM-ABHIM) 78 प्रकल्पांचा समावेश आहे (क्रिटिकल केअर विभागाची 50 एकके, एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेची 15 एकके, आणि सार्वजनिक आरोग्य विभागाची 13 एकके); राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सामुदायिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र, मॉडेल रुग्णालय, संक्रमण वसतिगृहे अशा विविध प्रकल्पांच्या 30 एककांचाही यात समावेश आहे.
पुणे येथील ‘निसर्ग ग्राम’ या राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थेचे उद्घाटनही यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते झाले यामध्ये निसर्गोपचार वैद्यकीय महाविद्यालयासह 250 खाटांचे बहु-विद्याशाखीय संशोधन आणि विस्तार केंद्र समाविष्ट आहे. यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते हरियाणा, झज्जर येथे योगविद्या आणि निसर्गोपचाराच्या प्रादेशिक संशोधन संस्थेचे उद्घाटनही होईल. यात सर्वोच्च स्तरावरील योगविद्या आणि निसर्गोपचार संशोधन सुविधा उपलब्ध असतील.
या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) च्या सुमारे 2280 कोटी रुपये खर्चाच्या 21 प्रकल्पांचे उद्घाटन आणि राष्ट्रार्पण केले.
SL/KA/SL
25 Feb. 2024