पुढील आठवड्यात उघडणार या ४ कंपन्यांचे IPO
मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : IPO मध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी येत्या आठवड्यात मोठी संधी उपलब्ध होणार आहे. कारण पुढील आठवड्यात 4 बड्या कंपन्यांचे आयपीओ उघडणार आहेत. यामध्ये देशातील सर्वात मोठी फिश मील कंपनी मुक्का प्रोटीन, प्लॅटिनम इंडस्ट्रीज, एक्झिकॉम टेली-सिस्टम्स आणि भारत हायवेज इनव्हीआयटीच्या आयपीओचा समावेश आहे.
इनिशिअल पब्लिक ऑफरिंग (IPO) म्हणजे सार्वजनिक गुंतवणूकदारांकडून इक्विटी कॅपिटल उभारण्यासाठी खाजगी कंपन्या त्यांचे शेअर्स जनतेला विकतात. IPO ची प्रक्रिया खाजगी मालकीच्या कंपनीचे सार्वजनिक कंपनीत रूपांतर करते. ही प्रक्रिया स्मार्ट गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळविण्याची संधी देखील निर्माण करते.
येत्या आठवड्यात उघडणाऱ्या IPO बद्दल थोडक्यात
Bharat Highways InvIT
भारत हायवेज इनव्हीआयटी आयपीओ 28 फेब्रुवारी रोजी उघडणार आहे. हा आयपीओ 1 मार्च 2024 पर्यंत खुला राहील.आयपीओमध्ये प्रति शेअर किंमत 98-100 रुपये आहे. आयपीओचा आकार 2500 कोटी रुपये आहे. आयपीओचे लिस्टिंग 6 मार्च रोजी होणार आहे. भारत महामार्ग InvIT एक पायाभूत गुंतवणूक ट्रस्ट आहे.
Exicom Tele-Systems IPO
इलेक्ट्रॉनिक वाहनांसाठी चार्जर बनवणारी कंपनी एक्सिकॉम टेली-सिस्टम्सचा आयपीओ 27 फेब्रुवारी रोजी उघडणार आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत पैसे गुंतवण्याची संधी असेल. किंमत 135-142 रुपये प्रति शेअर आहे. आयपीओचा आकार 429 कोटी रुपये आहे. कंपनी इलेक्ट्रिक वाहन चार्जर आणि स्मार्ट चार्जिंग सिस्टम बनवते. तर पॉवर सोल्यूशन्स व्यवसायात ती भारतात आणि परदेशातील दूरसंचार क्षेत्रातील वीज व्यवस्थापनासाठी डीसी पॉवर सिस्टमची रचना, निर्मिती आणि सेवा करते.
Mukka Proteins IPO
मुक्का प्रोटीन्सचा आयपीओ 26 फेब्रुवारीला उघडणार आहे. गुंतवणूकदार या आयपीओमध्ये 28 फेब्रुवारीपर्यंत गुंतवणूक करू शकतात. कोस्टल कर्नाटक स्थित कंपनी मुक्का प्रोटीन ही देशातील सर्वात मोठी फिश मील आणि फिश ऑइलची उत्पादक आहे. आयपीओचा आकार 225 कोटी रुपये आहे. आयपीओमध्ये प्रति शेअर किंमत 25-30 रुपये आहे. गुंतवणूकदारांना किमान एक लॉट म्हणजेच 14,700 रुपये किमतीचे 525 शेअर्स खरेदी करावे लागतील.
Platinum industries ipo
प्लॅटिनम इंडस्ट्रीजचा आयपीओ 27 फेब्रुवारी रोजी गुंतवणुकीसाठी उघडेल. हा आयपीओ 29 फेब्रुवारीला बंद होईल. आयपीओची किंमत 162-171 रुपये प्रति शेअर आहे. प्लॅटिनम इंडस्ट्रीजच्या आयपीओचा आकार 216 कोटी रुपये आहे. प्लॅटिनम इंडस्ट्रीज स्टॅबिलायझर्सच्या उत्पादनाच्या व्यवसायात आहे.
SL/KA/SL
25 Feb. 2024