निवृत्तीनाथ महाराजांचा ७५० वा महोत्सव साजरा

 निवृत्तीनाथ महाराजांचा ७५० वा महोत्सव साजरा

नाशिक, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विश्वगुरू संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या ७५० व्या जन्म महोत्सवा निमित्त नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर येथे विधीवत महापूजा संपन्न झाली.
निवृत्तीनाथ महाराजांच्या ७५१ व्या जन्ममहोत्सवा निमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले भाविक आणि स्त्री पुरूष वारकऱ्यांनी दर्शनासाठी गर्दी केली होती .

महापूजेनंतर हरी भक्त परायण एकनाथ महाराज गोळेसर आणि सहकारी यांचे कीर्तन तसेच अन्य धार्मिक विधी संपन्न होऊन भक्तांना महा प्रसादाचे वाटप करण्यात आले निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिरात दर्शनासाठी तसेच कीर्तन आणि अन्य धार्मिक विधींसाठी वारकरी शिक्षण संस्थातील बाल वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिराच्या जीर्णोद्धारचे काम सध्या सुरू असले तरी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा उत्साह कमी झालेला नाही ७५१ व्या जन्ममहोत्सवा निमित्त वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून संजीवन समाधी मंदिरात भाविकांनी भेट देऊन सेवेची संधी घ्यावी असे आवाहन संस्थेने केले आहे .

राज्यात निर्माण होऊ शकणारी दुष्काळी परिस्थिती अपुरा पाऊस आणि शेतकऱ्यांच्या समस्या यासारख्या संकट निवारणासाठी श्री क्षेत्र त्रंबकेश्वर आणि निवृत्तीनाथ महाराजांनी आशीर्वाद द्यावा यासाठी देखील यावेळी प्रार्थना करण्यात आली. Celebrating 750th anniversary of Nivrutinath Maharaj

ML/KA/PGB
25 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *