नागरी भागात शिरला टस्कर हत्ती, शेतीचे ही नुकसान

 नागरी भागात शिरला टस्कर हत्ती, शेतीचे ही नुकसान

कोल्हापूर, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील नागरी भागात तसंच किटवाड धरण परिसरात सकाळी टस्कर हत्ती आल्यानं खळबळ उडाली , टस्करानं काही शेतकऱ्यांच्या ऊसाचं नुकसान देखील केलं आहे. कुदनुर रस्त्यावर बराच काळ हत्ती ठाण मांडून होता.

कोलिक, हाजगोळी, जेलुगडे, कळसगादे, खामदळे, कानूर परिसरात नियमित हत्तीचा वावर असतो त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. गेल्या काही वर्षांत हत्तीचा वावर वाढल्यानं होणारे नुकसान टाळण्यासाठी संबंधित हाजगोळी, पार्ले, कानूर परिसरात उपाययोजना सुरू आहे. मात्र, आता हत्तीनं कधी नव्हे ते कर्यात भागातही एन्ट्री केल्यामुळे वन विभागाची डोकेदुखी वाढली आहे.

कर्यात भागात पहिल्यांदाच हत्ती आल्यानं बघ्यांची गर्दी झाली होती. वनक्षेत्रपाल
प्रशांत आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल,
वनरक्षक,हत्ती हाकारा पथकानं त्याला आजऱ्याच्या जंगलात पिटाळून लावलं. टस्कर आजरा
मासेवाडी भागातून तेऊरवाडी, दुडंगे, चिंचणे भागातून आल्याचं निदर्शनास आलं.मात्र
कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. Tusker elephants enter urban areas, this damage to agriculture

ML/KA/PGB
25 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *