डिगोळ ग्रामपंचायतीवर महिलांचा घागर मोर्चा
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :दिघोळ ग्रामपंचायतीला जोडलेल्या सोनारवाडी वस्तीत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. शिवाय पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे. त्यामुळे पाणी व मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी महिलांनी गुरुवारी दिघोळ ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला. आंदोलनादरम्यान सरपंच, उपसरपंच यांना अनेक मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मागण्यांमध्ये सोनारवाडीतील हातपंप व बोअरवेलची दुरुस्ती तसेच वस्तीतील पिण्याचे पाणी व सांडपाणी या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्याचा समावेश होता. वस्तीला मुबलक पाणीपुरवठा करणे, पाण्याच्या पाइपलाइन टाकणे, प्रत्येक घराला नळ जोडणी देणे आदी मागण्यांचा समावेश होता. ग्रामपंचायतीने सुविधा सुधारण्यासह या विविध मागण्यांचे निवेदन सरपंच कविता दसरे व उपसरपंच बाबासाहेब पाटील यांना देण्यात आले. अखेर लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनात जनाबाई वाडकर, रामदास वाडकर, बालाजी वाडकर, महादेव वाडकर, रंजना वाडकर, संगिता वाडकर, प्रियंका वाडकर, सुकूमार वाडकर, आशा वाडकर, चंद्रकलाबाई वाडकर, सारजाबाई वाडकर, रामदास वाडकर, हरीभाऊ वाडकर, भगवंत वाडकर, चंद्रकांत वाडकर, शिवशंकर वाडकर, मोहन वाडकर, ओमकार वाडकर, प्रमोद वाडकर, रामदास वाडकर, रंजनाबाई वाडकर, रुक्मिणीबाई वाडकर, वनमाला वाडकर, शिवशंकर वाडकर, मिरा वाडकर आदींचा सहभाग होता.
Women’s Ghagar Morcha on Digol Gram Panchayat
ML/KA/PGB
23 Feb 2024