मनोज जरांगे पाटील यांची भूमिका दुतोंडी

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मराठा आरक्षण प्रकरणी चर्चेत असणारे मनोज जरांगे पाटील यांची भूमिका संशयास्पद आहे. बंद दाराआड व मंचावर असताना वेगवेगळी भूमिका घेणारे पाटील यांची पोलखोल मी लवकरच करणार करणार असून पाटील यांचा खरा चेहरा मी समाजाला दाखवणार आहे. अशी धक्कादायक माहिती पूर्ण आंदोलनात जरांगे यांच्या सोबत असणारे ह. भ. प. अजय महाराज बारस्कर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत आज (बुधवारी) दिली.
मनोज जरांगे पाटील हे आपल्या सहकाऱ्यांबरोबर व बंद दाराआड होणाऱ्या त्यांच्या खास लोकांबरोबर वेगवेगळी माहिती देत मनमानी कारभार करत आहेत.असा आरोप करत यावेळी बारस्कर म्हणाले की, जरांगे पाटील हे संत तुकाराम यांच्या पेक्षा मोठे नाहीत.त्यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केल्यामुळे मी त्यांना जाब विचारला असता त्यांनी माझाही अपमान केला. त्यांची मुलगी म्हणते की, माझे वडील देवापेक्षा मोठे आहेत.हे योग्य आहे का ? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

यावेळी बारस्कर यांनी शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख न करता एक जनता राजा जरांगे यांचा पाठीशी आहे असा खुलासा केला. जरांगे यांच्यावर मी जे आरोप करत आहे त्याची रेकॉर्डिंग मी लवकरच जाहीर करणार आहे. मी पण एक मराठा आहे.मलाही माहीत आहे की , आजच्या पत्रकार परिषदेनंतर माझी अवस्था काय होणार आहे.तरीही मी हे आरोप करत आहे.कारण सत्य हे लोकांना वेळ निघून समजणार आहे.मी वारकरी माणूस आहे.सत्य जगाला सांगणे माझे काम आहे.असे बारस्कर यावेळी म्हणाले.

मी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहे. मधल्या काळात अंतरवालीत घटना घडली. मी आंदोलन लढ्यात पुन्हा सहभागी झालो. मराठवाड्यात ओबीसी नोंदीसाठी मी देखील अनेक वर्षांपासून काम करतोय. त्यामुळे जरांगे पाटील यांच्यासोबत कृतीत सहभागी झालो. मी यापूर्वी कधीच माध्यमासमोर आलो नाही. मी जरांगे यांना पाटील म्हणणार नाही. कारण जरांगेकडे पाटील पदासाठी काही नाही.
जरांगेच्या प्रत्येक कृतीला मी साक्षी आहे. मी प्रसिद्धीसाठी किंवा पैशासाठी आरोप करतोय असं बिलकुल नाही. मी कीर्तनाचे वगैरे पैसे घेत नाही.आताच हे का झालं तर काही दिवसापासून माझ्या मनातील खदखद होती ती आज व्यक्त केली, असे बारस्कर यावेळी म्हणाले. Manoj Jarange Patil’s role is ambiguous

ML/KA/PGB
21 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *