सगे सोयऱ्यांसाठी आता गावागावात रास्ता रोको

 सगे सोयऱ्यांसाठी आता गावागावात रास्ता रोको

जालना, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी 24 तारखेपासून राज्यात गावागावात रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे, सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी लवकर करावी या मागणीसाठी राज्यात रास्ता रोको करण्यात येणार आहे.
रास्ता रोको आंदोलनाचा निर्णय आज बैठकीत घेण्यात आला आहे.

मराठा आमदाराने मराठा आरक्षणाची भूमिका घेतली नाही असा गैरसमज समाजात पसरला, म्हणून त्यांनी आमच्या दारात येऊ नये असा ठराव आजच्या बैठकीत घेण्यात आला. याशिवाय आणखी काही निर्णय घेण्यात आले , ते पुढीलप्रमाणे….

1 मार्च रोजी वृद्ध मराठा समाज हा उपोषणाला बसणार आहे…

1 मार्च रोजी राज्यातल्या आजी माजी आमदार, आजी माजीबखासदार यांच्या सह सर्व मंत्र्यांची बैठक अंतरवालीत बोलवण्यात आलीय…

या नेत्यांना मराठा आरक्षणाविषयी आपली भूमिका मांडण्यासाठी बोलावले आहे…

3 मार्च रोजी राज्यात जिल्हास्तरावर एकाच ठिकाणी रस्ता रोको करण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीत घेण्यात आलाय…

3 मार्च रोजी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्ता रोको करण्यात येणार असून सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार…

तर 4 मार्च रोजी अंतरवालीत बैठक बोलवली आहे. त्या बैठकीत मुंबई जायचे का नाही किंवा दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन कसे करायचे याबाबत चर्चा होणार आहे…

राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या सह निवडनुक आयोगाला विनंती करण्यात आलीय, मराठा आरक्षणाची अंमलबजावणी झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नये.

आम्ही आचासंहितेचा मान राखतो

मराठा समाजाचा आग्रह होता आणि न्यायालयाने पण सांगितले होते त्यामुळे आता सलाईन द्वारे उपचार घेणार आहे, मात्र आमरण उपोषण सुरूच राहणार आहे. 1 मार्च रोजी सर्व पक्षीय नेत्यांनी अंतरवालीत यावे असे आवाहन जरांगे यांनी केले आहे.Stop the way in the village now for all the guests

ML/KA/PGB
21 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *