वसई – भाईंदर रो-रो फेरीबोट सेवा तूर्तास प्रायोगिक तत्त्वावर

ठाणे, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वसई आणि भाईंदर ही शहरे एकमेकांना जलमार्गाने जोडण्याच्या दृष्टीने, महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत मे. सुवर्णदूर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस प्रा. लि. या ऑपरेटर संस्थेद्वारे दि. २० फेब्रुवारी २०२४ पासून सुरु करण्यात आलेली वसई-भाईंदर रो-रो फेरीबोट सेवा ही तूर्तास फक्त प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात आलेली आहे.
मात्र या फेरीबोट सेवेचा कोणताही औपचारिक शासकीय लोकार्पण सोहळा अद्याप झालेला नाही. कारण, तूर्तास या फेरीबोटीचे जलमार्गातून होणारे नौकानयन तसेच बोटीतून प्रवासी आणि वाहनांची जेट्टीवर चढ-उतार सुलभ तसेच सुरक्षितपणे होत आहे किंवा कसे, या बाबींचा महाराष्ट्र सागरी मंडळाकडून अभ्यास करण्यात येत आहे.

या सर्व बाबींची एकदा खात्री झाल्यानंतरच, फेरीबोट सेवेचा शासकीय लोकार्पण सोहळा करण्यात येणार आहे.
त्यामुळे, वसई- भाईंदर ह्या रो-रो फेरीबोट सेवेचा शासकीय लोकार्पण सोहळा संपन्न झाल्याबाबत काही वर्तमानपत्रांमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, याची नोंद घ्यावी, असे मुंबई महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य बंदर अधिकारी कॅप्टन प्रवीण खरा यांनी कळविले आहे

Vasai – Bhayandar Ro-Ro ferry service currently on pilot basis

ML/KA/PGB
21 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *