धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उच्च न्यायालयाचा नकार

 धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उच्च न्यायालयाचा नकार

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. तसेच यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत.धनगर समाजासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे,या मागणीसाठी धनगर समाजाकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.आज या याचिकेवर
न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल काथा यांच्या खंडपीठाकडे सुनावणी झाली.

खंडपीठाने अशा आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्हाला हस्तक्षेप करता येणार नाही, धनगर समाजाला एसटीमधून आरक्षण देण्याचा आम्हाला अधिकार नाही. हा सर्वस्वी अधिकार संसद आणि संसदमंडळाचा आहे. कायद्यात दुरुस्ती करत संसदेतूनच हे आरक्षण दिलं जाऊ शकतं. असं म्हणत एसटीमधून आरक्षण देण्यासंबंधीत सर्व याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या.
गेल्या काही महिन्यांमध्ये धनगर समाजाने अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभरात आंदोलन आणि मोर्चे काढले होते. सध्या धनगर समाजाला एनटी (भटक्या जमाती) प्रवर्गाचे साडेतीन टक्क्यांचे आरक्षण आहे. एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळाले असते तर धनगर समाजाचे आरक्षण ७ टक्क्यांवर गेले असते.
आता धनगर समाजासमोर याविषयी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय शिल्लक राहिला आहे.या निर्णयानंतर आता धनगर समाज, याचिकाकर्ते पुढील कायदेशीर भूमिका काय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Bombay High Court refused to give reservation to Dhangar community from ST category

ML/KA/PGB
16 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *