राज्यसभेची निवडणूक होणार बिनविरोध

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातून विधानसभा सदस्यांमधून निवडून देण्याच्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत अपेक्षित राजकीय समीकरणे जुळत नसल्याने भाजपाने चौथी जागा लढविण्याचा विचार सोडून दिल्याने ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे.
सहा जागांपैकी तीन जागा भाजपाच्या होत्या , या जागांशिवाय आणखी एक अतिरिक्त जागा लढविण्याचा विचार भाजपाने केला होता, त्यासाठी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांना आपल्याकडे खेचण्यात ते यशस्वी झाले होते मात्र आधिकचे आमदार फुटून येणे म्हणजे मतांचा कोटा कमी करणे ठरणारे आहे. क्रॉसवोटिंग करून काँग्रेसचे आमदार अपात्र ठरतील असे गणित असल्याने राजकीय समिकरणे जुळत नाहीत म्हणून चौथी जागा लढविण्याचा विचार भाजपाने सोडून दिला आहे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांना सांगितले त्यानुसार ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.
दरम्यान काँग्रेसने आज माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे यांना उमेदवारी जाहीर करून विधान परिषदेत झालेल्या त्यांचा पराभवाची भरपाई केली आहे. शिवसेना शिंदे गटाने मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली आहे तर भाजपाने अपेक्षेनुसार अशोक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि डॉ अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर करून आश्चर्याचा धक्का दिला आहे. यामुळे नारायण राणे, विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांना पुन्हा वाट पहावी लागणार आहे. राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सायंकाळी उशिरा प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची घोषणा करून मोठा धक्का दिला आहे, त्यांची राज्यसभेची अजून साडेचार वर्षे बाकी आहेत. उद्या अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे The Rajya Sabha election will be held unopposed
ML/KA/PGB
14 Feb 2024