बोर्लीपंचतनमध्ये प्राचीन वृक्षाची कत्तल

 बोर्लीपंचतनमध्ये प्राचीन वृक्षाची कत्तल

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पर्यावरण संवर्धनासाठी राज्य सरकार वृक्षारोपण उपक्रम राबवत आहे. पन्नास वर्षे किंवा त्याहून जुनी झाडे प्राचीन वृक्ष म्हणून ओळखली जातात. मात्र, असे प्रयत्न करूनही वृक्ष व पर्यावरणाबाबत लोकांच्या उदासीनतेमुळे असंख्य झाडे नष्ट होत आहेत. अशीच एक घटना श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथे नुकतीच घडली असून तलाव आणि शंकर मंदिराजवळील एक मोठे डेरेदार वृक्ष नुकतेच तोडण्यात आले. लोकवस्तीच्या परिसरात ही झाडे तोडण्याचा सल्ला कोणी दिला आणि कोणी केला याबाबत पर्यावरणवाद्यांकडे अनेक चौकशी आहेत.

दिवसेंदिवस वृक्षसंपदा कमी होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. तापमानात वाढ होऊन पर्जन्यमान घटत आहे. अशातच धोकादायक फांद्यांच्या नावाखाली सरसकट झाडावरच कुऱ्हाड फिरवून नको ते संकट आपण ओढवून घेत आहोत. स्थानिक ग्रामपंचायतीजवळ याबाबत माहीती घेतली असता झाडाशेजारी असणाऱ्या विहीरीमध्ये त्या वृक्षाची पानं पडून पाणी अस्वच्छ होत होते, त्यामुळे त्या पाण्याचा वापर करणाऱ्या तेथील रहिवाशांनी विहीरीवर येणाऱ्या त्या वृक्षाच्या फांद्या तोडण्यासाठी लेखी अर्ज दिला होता. परंतू एवढ्या मोठ्या प्रमाणात या वृक्षाची छाटणी कुणी केली? ते माहीत नाही. त्याबाबत चौकशी करुन माहीती घेण्यात येईल असे सांगण्यात आले. जर झाडाची पानं पडून पाणी अस्वच्छ होत असेल तर या वृक्षाची एवढ्या मोठ्या प्रमाणात तोड न करता विहीरीच्या बाजूला चार खांब मारुन त्यावर कापडाची जाळी टाकली असती तर पालापाचोळा विहीरीत पडण्याचा प्रश्नच नव्हता. परंतू ग्रामपंचायतीने कोणताही निर्णय घेण्याआधीच या वृक्षाची तोड करण्याची घाई कुणाला झाली? तासभर प्राणवायू विकत देणाऱ्या डॉक्टरांना आपण देव मानतो पण आयुष्यभर तोच प्राणवायू फुकट देणाऱ्या आणि आपल्या डोक्यावर सावली धरणाऱ्या, पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या वृक्षाची निर्दयपणे झालेली तोड निसर्गप्रेमींसह अनेक नागरिकांच्या जिवाला चटका लावणारी आहे

Slaughter of an ancient tree in Borlipanchatan

ML/KA/PGB
11 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *