पहीले शिक्षक साहित्य संमेलनाचे झाले थाटात उद्‌घाटन

 पहीले शिक्षक साहित्य संमेलनाचे झाले थाटात उद्‌घाटन

छ. संभाजी नगर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने पहिले शिक्षक साहित्य संमेलन होत असून या संमेलनाचे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडलाच्या वैशाली जामदार यांच्या हस्ते मोठ्या थाटात उद्‍घाटन संपन्न झाले. सकाळी ग्रंथदिंडीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले त्या नंतर रान कवी ना. धो. महानोर साहित्यनगरीपर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली.

पहिल्यांदाच असे संमेलन होत आहे. संमेलना अध्यक्ष डॉ. हबीब भंडारे यांच्या अध्यक्षेखालील आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी अरुणा भूमकर, मधुकर देशमुख, जयश्री चव्हाण, प्राचार्य रवींद्र तोरवणे, निधी अग्रवाल, प्राचार्य संतोष कारवा आदीसह इतर मान्यवराची उपस्थिती होती. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने पहिल्यांदाच शिक्षक साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते यामध्ये ग्रंथ दिंडी, चित्रप्रदर्शन ,
उद्घाटन समारंभ, परिसंवाद, कवी संमेलन, विविध स्मरणिका प्रकाशन आदी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनास नामवंत साहित्यतिक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

The first Teachers’ Literature Conference was inaugurated

ML/KA/PGB
10 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *