महिलांना दरमहा मिळणार 1000 रुपये

 महिलांना दरमहा मिळणार 1000 रुपये

छायाचित्र प्रातिनिधीक

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महतारी वंदन योजनेंतर्गत महिलांकडून 5 ते 20 फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येणार आहेत. महतारी वंदन योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला छत्तीसगडची रहिवासी असणं अनिवार्य आहे. छत्तीसगडमध्ये महिला सक्षमीकरणाची मोदींनी दिलेली हमी पूर्ण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. येथील महिलांना 1 मार्चपासून महतारी वंदन योजनेंतर्गत दरमहा एक हजार रुपये मिळण्यास सुरुवात होणार आहे. 5 फेब्रुवारीपासून या योजनेचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील जनतेला अनेक आश्वासने दिली होती. या आश्वासनांची पूर्तता करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही योजना राबवण्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. महतारी वंदन योजनेअंतर्गत 1 मार्च 2024 पासून महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात होईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेचे वय 1 जानेवारी 2024 रोजी 21 वर्षे असणे आवश्यक आहे.Women will get Rs 1000 per month

ML/KA/PGB
10 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *