‘जय हनुमान कढई’ ठरली जगातील सर्वात मोठी कढई

 ‘जय हनुमान कढई’ ठरली जगातील सर्वात मोठी कढई

नागपूर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :अयोध्यातील श्रीराम प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्याच्‍या निमित्‍त नागपूरचे प्रसिद्ध शेफ ‘विक्रमवीर’ विष्‍णू मनोहर यांनी तयार केलेल्‍या ‘जय हनुमान कढई’ ला वर्ल्‍ड रेकॉर्डस् ऑफ इंड‍ियाने स्‍वयंस्फूर्तीने जगातील सर्वात मोठी कढईचा बहुमान देत ‘रेकॉर्ड’ बहाल केला आहे.

कोणताही विक्रम प्रस्‍थापित करायचा असल्‍यास त्‍यासाठी संबंधित संस्‍थेकडे प्रथम नोंदणी करावी लागते. त्‍यानंतर त्‍यांच्‍या अटी आणि नियमावलीनुसार विक्रम प्रस्‍थापित प्रयत्‍न करावा लागतो. परंतु, श्रीरामाचे आशीर्वाद म‍िळाल्‍यामुळे ‘जय हनुमान कढई’ ला वर्ल्‍ड रेकॉर्डस् ऑफ इंडियाने स्‍वयंस्‍फूर्तीने ‘जगातील सर्वात मोठी कढई’ बहुमान दिला असून त्‍यासंदर्भातील प्रमाणपत्र वर्ल्‍ड रेकॉर्डस् ऑफ इंड‍ियाचे संयोजक संजय नार्वेकर आणि एडिटर सुषमा नार्वेकर यांच्या तर्फे विष्‍णू मनोहर यांना देण्यात आले.

विष्णू मनोहर यांनी विश्‍वकर्मा फॅब्रिकेशन वर्क्‍स, एमआयडीसी, नागपूर येथून 15 हजार लिटर क्षमतेची 1800 क‍िलो वजन, 15 फूट त्रिज्‍या आणि 6 मीमी जाडीचा स्‍टीलचा पत्रा असलेली ही कढई श्रीराम प्राणप्रतिष्‍ठा सोहळ्याच्‍या अनुषंगाने तयार करवून घेतली होती. कढईचा तळ लोखंड तसेच तांबे या धातूंच्‍या म‍िश्रणातून तयार करण्‍यात आला होता. विशेष म्‍हणजे 22 जानेवारी 2024 रोजी म्‍हणजेच श्रीराम प्राणप्रतिष्‍ठेच्‍या दिवशीच वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडियामध्‍ये या कढईच्‍या नावे विक्रम नोंदविण्‍यात आला आहे.

या कढईची नागपुरात भव्‍य शोभायात्रा काढण्‍यात आली होती. हजारो रामभक्‍तांनी दर्शन घेतल्‍यानंतर 22 तारखेला एकीकडे अयोध्‍येत श्रीराम प्राणप्रतिष्‍ठा सोहळा सुरू असताना इकडे श्री जगदंबा संस्‍थान कोराडी येथे 7 हजार क‍िलोचा महाप्रसाद तयार करून नवा जागत‍िक विक्रम प्रस्‍थापित केला होता. ही कढई आता अयोध्‍येकडे रवाना झालेली असून तेथील श्रीराम मंदिर न्‍यासाला दान केली जाणार आहे. ‘Jai Hanuman Kadhai’ became the world’s largest kadhai

ML/KA/PGB
10 Feb 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *