RBI कडून Repo दर जैसे थे

 RBI कडून Repo दर जैसे थे

नवी दिल्ली, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समितीने व्याजदरांबाबत निर्णय घेतला आहे. तीन दिवस चाललेल्या या बैठकीनंतर गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी या वेळीही रेपो दर सलग सहाव्यांदा 6.5 ठेवला असल्याची माहिती दिली. यावेळी रेपो रेटमध्ये बदल होतील अशी सर्वसामान्यांना अपेक्षा होती.

आरबीआयने रेपो दरात कोणताही बदल न केल्याने भारतीय शेअर बाजार गुरूवारी 8 फेब्रुवारी रोजी घसरले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 723.57 अंकाने कोसळून 71,428.43 वर बंद झाला. तर निफ्टी 212.50 ने घसरून 21,718 वर स्थिरावला. बाजारात आज 1341 शेअर्स वाढले आहेत. 1908 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर 61 शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही.

आरबीआयच्या पतधोरणाच्या घोषणेनंतर भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. बँकिंग शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. त्यामुळ निफ्टी बँक 1.76 टक्क्यांच्या घसरणीसह 45012 वर बंद झाला. निफ्टी बँकेच्या 12 शेअर्सपैकी 9 शेअर्स घसरले. खाजगी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे शेअर्स नेत्रदीपक वाढीसह बंद झाले.

याशिवाय ऑटो, एफएमसीजी, मेटल आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्स घसरले. मात्र, तेल आणि वायू, ऊर्जा, मीडिया, आयटी क्षेत्रातील शेअर्स वाढीसह बंद झाले. आजच्या व्यवहारात निफ्टी मिड कॅप निर्देशांक किंचित वाढीसह बंद झाला तर स्मॉल कॅप निर्देशांक घसरला. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 8 शेअर्स वधारले आणि 22 शेअर्स घसरले. निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 14 शेअर्स वाढीसह आणि 36 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

निफ्टीमध्ये सर्वात मोठी घसरण ब्रिटानिया इंडस्ट्रीज, आयटीसी, कोटक महिंद्रा बँक, ॲक्सिस बँक आणि नेस्ले इंडियामध्ये झाली. तर, स्टेट बँक ऑफ इंडिया, बीपीसीएल, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन, टीसीएस आणि एचसीएल टेक्नॉलॉजीज निफ्टीमध्ये सर्वाधिक वाढले.

मोठ्या विक्रीमुळे सूचिबद्ध कंपन्यांच्या बाजारमूल्यात घसरण झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध शेअर्सचे बाजार मूल्य 388.72 लाख कोटी रुपयांवर आले. मागील सत्रात ते 389.25 लाख कोटी रुपये होते. त बाजारमूल्यात 53000 कोटी रुपयांची घसरण झाली आहे.

पेटीएमचे शेअर्स आज 10 टक्क्यांनी घसरले. शेअर्स 49.60 रुपयांनी घसरून 446.65 रुपयांवर बंद झाला. आरबीआयने 31 जानेवारी रोजी ऑनलाइन पेमेंट सेवा प्रदाता पेटीएमवर केलेल्या कारवाईचा मोठा परिणाम कंपनीच्या शेअर्सवर दिसून येत आहे. तेव्हापासून शेअर्स 41 टक्के घसरला आहे.

SL/KA/SL

8 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *