विडी तंबाखू व्यापारी सहकारी पतपेढीत गैरकारभार

 विडी तंबाखू व्यापारी सहकारी पतपेढीत गैरकारभार

मुंबई दि.8 (एम एमसी न्यूज नेटवर्क ) : विडी तंबाखू व्यापारी सहकारी पतपेढीत खोटी कागदपत्रे सादर करून कर्ज वितरित करून करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पतपेढीचे सदस्य भालचंद्र श्रीराम खातू यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत केला.

या करोडो रुपयांच्या घोटाळ्यासंदर्भात ना.म.जोशी मार्ग पोलीस ठाणे येथे अध्यक्ष व संचालक मंडळांचा एकूण १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली असल्याची माहिती खातू यांनी दिली.

माहीमचे रहिवाशी पतपेढीचे सभासद भालचंद्र खातू यांनी २०१२ सालात प्रत्येकी २५ लाख असे एकूण १ कोटी रुपयांचे दुकान व घर तारण ठेवून कर्ज घेतले होते. दरम्यान, जुलै २०१४ ते सप्टेंबर २०१४ या कालावधीत खातू यांना पतपेढीकडून कर्ज वसुलीसाठी चार नोटीसा पाठवण्यात आलेल्या होत्या. या नोटीसीनंतर सप्टेंबर २०१५ मध्ये कर्जदार खातू यांनी ४५ हजार रुपयाची पतपेढी भरणा केली. नंतर कर्ज घेतल्याच्या तारखा आणि त्यांनी आतापर्यंत पतपेढी भरणा केलेल्या रकमेत तफावत आढळून आली. पतपेढीत असलेल्या तीन मुदत ठेवी पतपेढीकडून विनापरवानगी कमी व्याजदराने खातू यांच्या खात्यावर वळवून रोखीने तीन लाख रुपये काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मुदत ठेव मोडताना कुठलाही प्रकारची परवानगी अथवा ठेवीदारांची स्वाक्षरी घेण्यात येत नाही. संचालक मंडळाचा मनमानी कारभार सुरू असतो. याबाबत संचालक मंडळाकडे चौकशी केली असता संचालक मंडळांनी अद्याप पर्यंत काही उत्तर दिलेले नाही. सदर सहकारी पतपेढीत मोठ्या प्रमाणात गैर व्यवहार व कर्ज घोटाळा तसेच सभासदांची फसवणूक केल्याचा आरोपही भालचंद्र खातू यांनी केला आहे.

ML/KA/SL

8 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *