पोलीस अधिकाऱ्यासह तीन निवृत्त सनदी अधिकाऱ्यांवर आयकर छापे

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वादग्रस्त सेवानिवृत्त पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या सोबतच तीन निवृत्त सनदी अधिकाऱ्यांच्या घरी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकल्याची बातमी असून या छाप्यांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत यामागे नेमके काय कारण आहे ते अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार प्रदीप शर्मा यांच्या सोबत निवृत्त सनदी अधिकारी अजोय मेहता , निर्मलकुमार देशमुख आणि संजय पांडे यांच्या घर आणि कार्यालयात आयकर विभागाकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. प्रदीप शर्मा हे मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपी आहेत. ते वर्षभरापासून अधिक काळ जेलमध्ये होते. त्यानंतर नुकतंच त्यांना सुप्रीम कोर्टातून जामीन मंजूर झाला होता. ते जामिनावर बाहेर होते. त्यांचं अंधेरी आणि आणखी एका ठिकाणी निवासस्थान असल्याची माहिती मिळत आहे.
प्रदीप शर्मा यांच्या वतीने सुरुवातीला आयकर अधिकाऱ्याना विरोध करण्यात आला होता, मात्र त्यानंतर छापेमारी आणि शोध मोहीम सुरु आहे ,प्रकरण नेमकं काय आहे याबाबतची सविस्तर माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
ML/KA/SL
8 Feb. 2024