ऊसाला वाढीव प्रति टन शंभर रुपये द्या, अन्यथा तीव्र आंदोलन

 ऊसाला वाढीव प्रति टन शंभर रुपये द्या, अन्यथा तीव्र आंदोलन

कोल्हापूर, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रति टन १०० रुपये द्या अन्यथा साखर सहसंचालक कार्यालयास टाळे ठोकून साखर अडवू असा इशारा ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

तातडीनं शेतक-यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडके यांच्याकडे करण्यात आली आहे. ज्या साखर कारखान्यांनी ३ हजार रूपयांपेक्षा कमी दर दिला आहे त्या कारखान्यांना प्रतिटन १०० रूपये आणि ज्या कारखान्यांनी ३ हजार रूपयांपेक्षा जादा दर दिला आहे त्यांना प्रतिटन ५० रूपये प्रतिटन देण्याचा तोडगा मान्य करण्यात आलेला होता, त्यानुसार हा इशारा देण्यात आला आहे.

कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांमध्ये ३१ जानेवारीअखेर चालू गळीत हंगामातील क्रांती साखर कारखान्याची ४० कोटी, वारणा कारखाना २७ कोटी आजरा १० कोटी, भोगावती ६ कोटी, हुतात्मा १४ कोटी, सदाशिवराव मंडलिक ९ कोटी,कुंभी ५ कोटी रूपयाची एफ. आर. पी थकविण्यात आली आहे.

ML/KA/SL

8 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *