उल्हासनगर मध्ये गोळीबार , भाजपा – शिंदे गटात राडा, आमदार गायकवाडांना अटक

 उल्हासनगर मध्ये गोळीबार , भाजपा – शिंदे गटात राडा, आमदार गायकवाडांना अटक

ठाणे, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क): ठाणे दि ३– ठाणे जिल्ह्यात भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रचंड राडा होऊन काल रात्री भर पोलीस ठाण्यात भाजपा आमदाराने गोळीबार केला,यात शिंदे गटाचे दोघे जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण पूर्व भागातील एका जमिनीच्या वादावरून हा गंभीर प्रकार घडला असला तरी त्याआधी दोन्ही बाजूच्या नेत्यांमधील सातत्याने वाढत गेलेली वादावादी यासाठी कारणीभूत ठरली आहे. आपल्या जमिनीत बळजबरीने प्रवेश करून तिचा ताबा घेण्याचा प्रयत्न शिंदे गटाचे स्थानिक प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला असा आ गायकवाड यांचा आरोप आहे.

काल रात्री याप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात दोन्ही गटाचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमा झाले होते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासमोर हे प्रकरण सुरू असताना अचानक मोठी वादावादी झाली आणि थेट हाणामारीत तिचे पर्यवसान झाले . यातच आ गायकवाड यांनी थेट आपले परवाना असलेले पिस्तूल काढत महेश गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यावर पाच गोळ्या झाडल्या , यात ते दोघे जखमी झाले, त्यांना ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान आपण स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला असून भर पोलीस ठाण्यात आपल्या मुलाला शिंदे गटाच्या गुंडांनी मारहाण केली त्यामुळे आपण हे केले असे आ गायकवाड यांनी म्हटले आहे.

याप्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर फायरिंग आणि हत्येचा प्रयत्न करण्याची कलमे दाखल करत गणपत गायकवाड,हर्षल केणे ,संदीप सर्वांकर ला पोलिसांनी केली अटक केली आहे. कल्याण न्यायालयासमोर त्यांना आज संध्याकाळी हजर करण्यात आले, त्यांना अकरा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून १४ तारखेला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

अटक केलेल्या आ गायकवाड यांना कल्याण मधील तणावाची स्थिती लक्षात घेऊन कळवा येथील पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे, याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आ गायकवाड यांचे घर आणि कार्यालय याच्या बाहेर ही मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.याआधी न्यायालयाबाहेर आ गायकवाड यांचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती. तर दुसरीकडे शिंदे गटातील कार्यकर्त्यांकडून कल्याण पूर्व परिसरात बंदची हाक दिली गेली होती.

ML/KA/SL

3 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *