शेवयांची खीर
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आजच्या उपावसाच्या फराळासाठी ही चटकन होणारी पाककृती करून पाहा.
…
उपासाच्या शेवया – दोन वेटोळे ,
दूध – साधारण ४ कप ,
साखर – चवीनुसार, ५-६ टे स्पून,
साजूक तूप – ३-४ टे स्पून,
वेलची पुड – चिमूटभर
शिंगाड्याच्या पिठाच्या शेवया विकत मिळतात, त्या आणाव्यात.
क्रमवार पाककृती:
१. शेवयांचे वेटोळे उकलून हातानेच चुरा करा. खूप कडक असतात. थेट भाजताना तोडायला गेल्यास इकडे तिकडे उडून पडतात. त्यामुळे आधीच शेवया एका टोपात उडणार नाहीत अशा बेताने काळजीपूर्वक तोडून घ्याव्यात.
2. ह्या तोडलेल्या शेवया खमंग मंद आचेवर जाड बुडाच्या भांड्यात तुपावर भाजून घ्या.
३. एकीकडे दूध तापण्यासाठी ठेवून द्या, कमी आचेवर.
४. भाजताना शेवया फुलतील. लगेच लाल होऊन काळ्या पडू शकतात. त्यामुळे सतत हलवत राहून भाजायचे आहे. साधारण लालसर झाल्या की आच बंद करा.
५. भाजलेल्या शेवयांवर हळूहळू गरम दूध ओता.
६. आता त्यावर साखर घाला.
७. खिरीचे मिश्रण नीट ढवळून घ्या. झाकण ठेवा.
८. जरा वाफ आली की त्यावर वेलचीपूड व तुमच्या आवडीचा सुकामेवा घालू शकता.
ही खीर गरम किंवा थंड कशीही छानच लागते. एवढंच की थंड झाल्यावर लगेच आळते आणि घट्ट होते.
Pudding of fasting
ML/ML/PGB 30 APR 2024