पालक-शेंगदाण्याची आमटी

 पालक-शेंगदाण्याची आमटी

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 1 जुडी पालकची पाने, शेंगदाणे ½ वाटी अर्धा तास आधी पाण्यात भिजवून ठेवणे, लसूण 4 ते 5 पाकळ्या, कांदा 1 मध्यम आकाराचा बारीक चिरून, 5-6 कढीपत्त्याची पाने, हळद ¼ चमचा, राई ¼ चमचा, मालवणी मसाला 1 ते दीड चमचा, तेल 2 चमचे, मीठ चवीनुसार

पालकची पाने बारीक चिरून घेणे. भिजवलेले शेंगदाणे व चिरलेला पालक थोडे पाणी व अर्धा चमचा मीठ टाकून कूकरला 2 शिट्ट्या काढून शिजवून घेणे.

वाटणासाठी – ¼ वाटी ओल खोबर, ¼ वाटी सुक खोबर किसलेले, 2 मोठे कांदे, 3 ते 4 पाकळ्या लसूण – हे सर्व साहित्य पॅन वर भाजून त्याचे वाटण करून घेणे.

क्रमवार पाककृती: 

कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून त्यात 3-4 लसूण च्या पाकळ्या ठेचून घालाव्या. लसूण परतल्यावर त्यात राई, बारीक चिरलेला कांदा, कढीपत्त्याची पाने, हळद व मसाला घालून परतून घ्यावे. त्यात वाफवून घेतलेले पालक व शेंगदाणे घालावेत. नंतर त्यात तयार केलेले वाटण व आवश्यकतेनुसार पाणी घालावे. चवीनुसार मीठ घालावे. (आपण पालक शिजवताना थोड मीठ टाकलेले असल्याने नंतर मीठ कमी घालावे). छान उकळी आली की पालक शेंगदाण्याची आमटी तयार.

Spinach-peanut jam

ML/ML/PGB 4 Aug 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *