NHAI ने वाढवली फास्टॅगमध्ये केवायसी अपडेट करण्याची मुदत

 NHAI ने वाढवली फास्टॅगमध्ये केवायसी अपडेट करण्याची मुदत

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : fastag च्या वापरामुळे महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या वेळेत खूप बचत झाली आहे. तुम्हीही फास्टॅग वापरत असाल तर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) ने दिलासा दिला आहे. आता महामार्ग प्राधिकरणाने फास्टॅग केवायसी अपडेट करण्याची तारीख वाढवली आहे. फास्टॅग केवायसीची मुदत एक महिन्याने वाढवण्यात आली आहे. तुम्ही fastag.ihmcl.com द्वारे फास्टॅग केवायसी अपडेट करू शकता. येथे तुम्हाला मोबाईल नंबरद्वारे लॉग इन करावे लागेल. ते उघडल्यानंतर तुम्हाला केवायसी अपडेटचा पर्याय दिसेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे पॅन किंवा आधार कार्ड अपलोड करावे लागेल.

तुम्ही तुमच्या कारच्या फास्टॅगचे बँकेकडून तुमचे केवायसी अपडेट केले नसेल तर तुमच्याकडे आणखी एक महिन्याचा वेळ आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने बँकांना 31 जानेवारी 2024 नंतर केवायसी शिवाय फास्टॅग निष्क्रिय करण्यास सांगितले होते. म्हणजेच 31 जानेवारीनंतर तुम्ही केवायसी न केल्यास तुमचा फास्टॅग निष्क्रिय होणार होता. मात्र, आता तुम्ही 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत फास्टॅगचे केवायसी पूर्ण करू शकता.

तुम्ही देशातील कोणत्याही टोल प्लाझावरून फास्टॅग खरेदी करू शकता. याशिवाय ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एसबीआय, कोटक बँकेच्या शाखांमधून देखील ते खरेदी करता येते. पेटीएम, ॲमेझॉन, गुगल पे सारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून देखील ते खरेदी करता येते. तुम्ही तुमचे फास्टॅग खाते या ॲपशी लिंक करून पेमेंट देखील करू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तुमचे बँक खाते या ॲपशी लिंक करू शकता.

फास्टॅग केवायसी अपडेटसाठी कागदपत्रे

  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • ओळखपत्र
  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • तुमच्या वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (RC).

SL/KA/SL

1 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *