पहिल्याच बैठकीत मविआ नेत्यांनी वंचित आघाडीला बाहेर बसवले

मुंबई दि.30 ( एम एमसी न्यूज नेटवर्क): वंचित बहुजन आघाडीचा समावेश महाविकास आघाडी आणि इंडिया मध्ये करावा अशी भूमिका सातत्याने मांडणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या उपाध्यक्षाला पहिल्याच बैठकीत मविआ नेत्यांनी बाहेर बसवल्याने वंचितच्या कार्यकत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
मुंबईतील ट्रायडेंड हॉटेलमध्ये आज महाविकास आघाडीची बैठक झाली.या बैठकीतला वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर गेले होते. त्यावेळी डॉ. पुंडकर यांनी बैठकीत आपला अजेंडा महाविकास आघाडीसमोर सादर केला. तेव्हा आम्ही चर्चा करून सांगतो असं म्हणून त्यांना १ तास बैठकी बाहेर बसवून ठेवण्यात आले आणि आतमध्ये महाविकास आघाडीच्या तिघा पक्षांची बैठक सुरू होती. आजच्या बैठकीत मिळालेल्या वागणुकीबाबत डॉ. पुंडकर यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
SW/KA/SL
30 Jan. 2024