केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पूर्वी बाजारातील (Stock Market) घसरण वाढली

 केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पूर्वी बाजारातील (Stock Market) घसरण वाढली

मुंबई, दि. 27 (जितेश सावंत) : २५ जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये 1% घसरण झाली. कंपन्यांचे संमिश्र तिमाही निकाल,यूएस फेड रेट कटमध्ये संभाव्य विलंब, मध्य पूर्वेतील तणाव,FII ची सतत विक्री तसेच रिलायन्स आणि एचडीएफसी बँक या समभागात झालेली जोरदार विक्री या सगळ्याचा परिणाम बाजारावर होताना दिसला.
गेल्या दोन महिन्यांत खरेदी केल्यानंतर, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारानी (FII )या महिन्यात आतापर्यंत 13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त भारतीय समभागांमध्ये विक्री केली.

येणाऱ्या आठवड्यात गुंतवणूकदारांचे लक्ष L&T,ITC,Maruti Suzuki अश्या दिग्गज कंपन्यांचे निमाही निकाल,फेडचे व्याज दर निर्णय (FED interest rate decision), बँक ऑफ इंग्लंड व्याज दर निर्णय (BOE interest rate decision) आणि सगळ्यात महत्वाचा असा भारताचा अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्प (Interim union budget) याकडे असेल.

Technical view on nifty

येणारा आठवडा हा अर्थसंकल्पीय आठवडा असल्याने बाजारात मोठे चढ उतार दिसतील शनिवारी निफ्टीने 21352.6 चा बंद भाव दिला..तांत्रिकद्रुष्ट्या बाजारात कमकुवत पणा जाणवत आहे. निफ्टी साठी 21247-21192-हे महत्वाचे सपोर्ट स्तर आहेत हे तोडल्यास निफ्टी 21074-21034-
20976-20906-20867-हे स्तर गाठेल.हे स्तर तोडल्यास घसरण वाढेल.गुंतवणूकदारानी घसरणीचा लाभ घ्यावा आणि चांगल्या समभागात गुंतवणूक करावी.वरच्या स्तरावर निफ्टी साठी 21454-21529-
21571-21622 – 21653-
21724-21755-21834 हे रेसिस्टन्स ठरतील.

सेन्सेक्समध्ये जवळपास 1.5% घसरण मागील
सत्रातील जोरदार विक्रीचा सिलसिला आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजाराने अनुभवला. सकारात्मक जागतिक बाजाराच्या पार्श्वभूमीवर, बेंचमार्क निर्देशांकांची सुरुवात भक्कम झाली परंतु बहुतेक क्षेत्रांमध्ये झालेल्या विक्रीसह घसरणीस कारणीभूत ठरलेले दोन दिग्गज म्हणजे रिलायन्स आणि एचडीएफसी बँक,बाजारातील 1/3 घसरण निव्वळ एचडीएफसी मुळे झाली , तसेच घसरणीतील दुसरा सर्वात मोठा योगदानकर्ता ठरला रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) चा समभाग यात 2% घसरण झाली, यात भर
पडली ती विदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीची, तसेच सोनीने झी सोबतचा 10 अब्ज डॉलरचा करार तोडण्याची घोषणा आणि यूएस, ब्रिटीश सैन्याने दुसऱ्यांदा येमेनवर केला हल्ला यामुळे बाजारातील घसरण वाढली. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 1,053.10 अंकांनी घसरून 70,370.55 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 333.00 अंकांची घट होऊन निफ्टीने 21,238.80 चा बंद दिला. Sensex down nearly 1.5%

सेन्सेक्सची 690 अंकांची उसळी

सलग दोन दिवसांचा विक्रीचा सिलसिला बुधवारी बाजाराने तोडला आणि मागील सत्रातील तोटा काही प्रमाणात भरून काढला.मजबूत सुरुवातीनंतर, संपूर्ण सत्रात बाजार वर खाली असा झुलत राहिला परंतू शेवटच्या तासातील खरेदीमुळे दिवसाच्या उच्चांकाचवर बंद झाला.एचडीएफसी बँकेसारख्या हेवीवेट शेअर्समध्ये झालेल्या चांगल्या वाढीने तसेच आयटी शेअर्समधील मोठ्या खरेदीने बाजाराला मजबूत आधार दिला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 689.76 अंकांनी वधारून 71,060 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 215.15अंकांची वाढ होऊन निफ्टीने 21,454 चा बंद दिला.

Sensex zooms 690 pts

सेन्सेक्स 360 अंकांनी घसरला
आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजार प्रचंड चढ-उतार पाहावयास मिळाले. सेन्सेक्स आणि निफ्टीने आदल्या दिवशीचा नफा पुसून टाकला. गुंतवणूकदारांनी केलेल्या प्रॉफिट बुकींग मुळे खास करून बँक,आयटी आणि एफएमसीजी शेअर्समधील नफावसुलीमुळे बाजारातील घसरण वाढली दिवसभरात सेन्सेक्स700 अंकांनी
गडगडला.बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले.
एफआयआयची विक्री आणि अमेरिकेच्या लवकर दर कपातीच्या आशा मावळल्याने बाजारावर दबाव वाढला. दिवसभराच्या अखेरीस सेन्सेक्स 359.64अंकांनी घसरून 70,700.67 वर बंद झाला.दुसरीकडे निफ्टीत 101.40 अंकांची घट होऊन निफ्टीने 21,352.60 चा बंद दिला. Sensex drops 360 pts

(लेखक शेअरबाजार तसेच सायबर कायदा तज्ञ,आहेत )

jiteshsawant33@gmail.com

ML/KA/PGB
27 Jan 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *