महालक्ष्मी एक्सप्रेस एलएचबी कोचवर नव्या रूपात धावण्यास सुरू

कोल्हापूर, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस आणि कोल्हापूर – तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेस आता एलएचबी कोचवर नव्या रूपात धावण्यास सुरुवात झाली आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महालक्ष्मी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. त्यानंतर मिरजेत कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे आणि खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून महालक्ष्मी एक्सप्रेस मुंबईकडे रवाना करण्यात आली.
महालक्ष्मी आणि हरिप्रिया ही लिंक एक्सप्रेस 1974 पासून आजपर्यंत आयसीएफ कोचवर धावत होती. दोन्ही लिंक एक्सप्रेसला एलएचबी कोच जोडावेत अशी मागणी होती. त्याला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मंजुरी दिली होती. त्यानंतर रेल्वे कडून महालक्ष्मी एक्सप्रेस आणि हरिप्रिया एक्सप्रेसला एलएचबी कोच जोडण्यात आले आहेत. कोल्हापूर मधून महालक्ष्मी एक्सप्रेसचा नवा रेक घेऊन मुंबईकडे रवाना झाली. महालक्ष्मी एक्सप्रेसला एलएचबी कोचचा नवीन रेक जोडण्यात आला आहे.
SL/KA/SL
26 Jan. 2024