लोकप्रिय लुनाचा इलेक्ट्रिक व्हेरिएंट उद्या होणार लाँच

 लोकप्रिय लुनाचा इलेक्ट्रिक व्हेरिएंट उद्या होणार लाँच

मुंबई, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

कायनेटिक कंपनीच्या लहानखुऱ्या लुना स्कुटरने एकेकाळी लोकांच्या मनात घर केले होते. हीच लुना आता आधुनिक अवतारात समोर येणार आहे.कायनेटिक ग्रीन कंपनी पुढील महिन्यात इलेक्ट्रिक लूना लाँच करण्याच्या तयारीत आहे आणि असे म्हटले जात आहे की त्याचे बुकिंग उद्या 26 जानेवारी 2024 पासून 500 रुपयांच्या टोकन रकमे करता येणार आहे.

लोक बऱ्याच काळापासून कायनेटिक ई-लुनाची वाट पाहत आहेत. या सर्वांमध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनी आपल्या पेट्रोल मॉडेलच्या तुलनेत इलेक्ट्रिक मॉडेलमध्ये बदल करणार आहे. लुना एकेकाळी निम्न मध्यमवर्गीय लोकांची आवडती होती. त्यात 50 सीसीचे पेट्रोल इंजिन होते आणि सायकलसारखे पेडल्स होते. आता ई-लुनामध्ये 2 kWh पर्यंतची लिथियम-आयन बॅटरी असू शकते, जी एका चार्जवर 70-80 किलोमीटरची रेंज गाठू शकते.

कायनेटिक ई-लुना कमी स्पीडचे इलेक्ट्रिक मोपेड म्हणून लाँच केले जाऊ शकते, ज्याचा उच्च वेग 25 किलोमीटर प्रति तास असू शकतो. लूक आणि फीचर्सच्या बाबतीत, हे त्याच्या जुन्या मॉडेलच्या तुलनेत चांगले लूक आणि अपडेट फीचर्सने सुसज्ज असेल. यात सर्व एलईडी सेटअप असू शकतात, म्हणजे एलईडी हेडलाइट्स, डीआरएल आणि टेललाइट्ससह इलेक्ट्रिक सेल्फ स्टार्ट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, यूएसबी चार्जर आणि इतर स्टँडर्ड आणि सेफ्टी फीचर्स असतील.

कायनेटिक लुना इलेक्ट्रिक फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात लाँच केली जाऊ शकते. तिची त्याची किंमत एक लाख रुपयांपेक्षा कमी असेल. विश्वासार्ह इलेक्ट्रिक स्कूटर शोधत असणाऱ्यांसाठी Kinetic E-Luna हा एक चांगला पर्याय म्हणून येऊ शकतो. लूना इलेक्ट्रिक किंमत आणि रेंज तसेच लुक-फीचर्स लवकरच समोर येतील.

SL/KA/SL

25 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *