या देशाचे राष्ट्रध्यक्ष आहेत प्रजासत्ताकदिनाचे प्रमुख पाहुणे

 या देशाचे राष्ट्रध्यक्ष आहेत प्रजासत्ताकदिनाचे प्रमुख पाहुणे

नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

26 जानेवारी रोजी दिल्लीत कर्तव्यापथावर होणाऱ्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन उपस्थित राहणार आहेत.ते भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणारे सहावे फ्रेंच नेते असतील. त्याआधी जयपूरमध्ये, ताज रामबाग पॅलेसमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल. ज्यामध्ये भारत-फ्रान्स संबंध आणि विविध गोष्टीवर चर्चा होईल. त्याआधी मॅक्रॉन पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत रोड शोमध्ये सहभागी होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मॅक्रॉनसोबतची उत्कृष्ट केमिस्ट्रीही अनेक प्रसंगी पाहायला मिळाली आहे. 2023 मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनाच्या बॅस्टिल डे सेलिब्रेशनला प्रमुख पाहुणे होते. या वेळी पंतप्रधान मोदींना फ्रान्सकडून लीजन ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले होते. हा फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान आहे. यासह पंतप्रधान मोदी हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले होते.

दोन्ही नेत्यांमध्ये डिजिटल डोमेन, संरक्षण, व्यापार, ऊर्जा, भारतीय विद्यार्थ्यांसाठी व्हिसा नियम सुलभ करणे यासह अनेक क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय चर्चा होईल. 26 जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन प्रमुख पाहुणे म्हणून प्रजासत्ताक दिन परेडचे साक्षीदार होतील. संध्याकाळी ते राष्ट्रपती भवनात भारताच्या राष्ट्रपतींच्या ‘अॅट होम’ स्वागत समारंभात सहभागी होतील.

भारत सरकारने प्रजासत्ताक दिनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना पाहुणे म्हणून आमंत्रित केले होते. बायडेन यांना येणं शक्य नसल्याने फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाशी शेवटच्या क्षणी चर्चा झाली आणि द्विपक्षीय संबंधांचे महत्त्व पाहून मॅक्रॉन यांनी या दौऱ्याला हिरवा झेंडा दिला.

SL/KA/SL

24 Jan, 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *