अयोध्या नगरीला आधुनिक रूप देण्याची जबाबदारी या प्रसिद्ध टाऊन प्लॅनरवर
अयोध्या, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शरयु तीरावरी अयोध्या, मनु निर्मितनगरी, असे वर्णन गीत रामायणामध्ये ग.दि. माडगुळकर यांनी केले आहे. ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेल्या अयोध्या नगरीचे भाग्य आता उजळले असून श्रीराम प्रभूंच्या प्राणप्रतिष्ठेनंतर आता या शहराला जागतिक नकाशावर पुन्हा एकदा मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. देशाच्या सांस्कृतिक संचिताचे प्रतिक असलेल्या अयोध्या नगरीला आता अत्याधुनिक रूप दिले जाणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येच्या विकासाची (Ayodhya Development) जबाबदारी प्रसिद्ध टाऊन प्लॅनर दिक्षु कुकरेजा यांच्यावर सोपवली आहे. कुकरेजा यांनी याआधी नवी दिल्लीत G-20 परिषदेसाठी भारत मंडपम आणि यशोभूमी कन्वेंशन सेंटर तयार केलं होतं.
अयोध्येचा सौंदर्यीकरण आणि आधुनिकीकरण करत असताना अयोध्येचं ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व कायम राहावं याकडे विशेष लक्ष देण्यात येत असून शरयूचे घाटही विकसित केले जाणार आहेत.. तर रस्त्यांचे रुंदीकरण ही नियोजनबद्ध पद्धतीने केले जाणार आहे.. त्यासाठीचा काही काम राम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आधीच पूर्ण झालं असून उर्वरित काम सोहळा पूर्ण होताच नव्या दमानं सुरू करण्यात आलाय…
दिक्षू कुकरेजा (Dikshu Kukreja) हे प्रसिद्ध वास्तुविशारद आहेत. दिक्षू कुकरेजा सीपी कुकरेजा आर्किटेक्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. सीपी कुकरेजा ही देशातील सर्वोत्तम आर्किटेक्ट फर्म आहे. कुकरेजा यांचं काम प्रासंगिकता आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासह शाश्वत दृष्टीकोनासाठी ओळखलं जातं.
SL/KA/SL
24 Jan. 2024