सुरतमध्ये स्थलांतरित झालेले हिरे व्यापारी करत आहेत घरवापसी

 सुरतमध्ये स्थलांतरित झालेले हिरे व्यापारी करत आहेत घरवापसी

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातकडे वळवले जात असल्याचे चित्र गेल्या काही महिन्यांपासून दिसत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते १७ डिसेंबरला सुरत डायमंड बोर्स इमारतीचे उद्घाटन करण्यात आले होते. हा पंतत्पधानांचा ड्रिम प्रोजेक्ट असल्याचे मानले जाते. यानंतर मुंबईतील १०० हून अधिक हिरे व्यापाऱ्यांनी सुरतमध्ये स्थलांतर केल्याची माहिती समोर आल्याने मोठी खळबळ निर्माण झाली होती. मात्र यानंतर आता एका महिन्याच्या आतच सुरतला स्थलांतरित झालेले बडे हिरे व्यापारी पुन्हा एकदा मुंबईला घरवापसी करत असल्याची माहिती समोर आली आहे. सुरत शहर आणि बोर्स यांच्यामधील अंतर व्यापाऱ्यांना सोयीचे नसून या ठिकाणी सार्वजनिक वाहतुकीचाही अभाव आहे. याशिवाय कर्मचारी स्थलांतर करण्यास तयार नसल्यामुळेही हिरे व्यापाऱ्यांची गाडी पुन्हा मुंबईकडे वळत आहेत.

डायमंड बोर्स सर्वात जगातील मोठी कार्यालयीन इमारत आहे. येथे ४,२०० हून अधिक हिरे व्यापार कार्यालये आहेत. मात्र, बोर्ससाठी पुढाकार घेणारे प्रसिद्ध हिरे व्यापारी वल्लभभाई लखानी खुद्द आपला व्यवसाय पुन्हा मुंबईला हलवणार असल्याचं समोर आलं आहे.सुरत डायमंड बोर्स सुरू होण्यापूर्वी देशाची आर्थिक राजधानी मुंबई हिरे व्यापाराचे केंद्र मानले जात होते. परंतु SDB उघडल्यानंतर सुरत देखील दागिने आणि हिरे व्यापाराचे एक मोठे केंद्र बनेल असे वाटते होते, मात्र आता या डायमंड बोर्सला मोठा धक्का बसताना दिसत आहे.

किरण जेम्सचे सर्वेसर्वा वल्लभभाई लखानी यांचा सूरत डायमंड बोर्स उभे करण्यात मोठा वाटा आहे मात्र, मुंबईतील इतर व्यापाऱ्यांकडून सहकार्य लाभ नसल्यामुळे लखानी आपला व्यवसाय पुन्हा मुंबईला हलवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. मुंबईतील हिरे व्यापारी आपलं बस्तान सूरतला हलवण्यास तयार नसून हा बोर्स सूरमधील हिरे केंद्रपासून दूर असल्याने कर्मचारी आणि मजूर देखील काम करण्यास तयार नसल्याचे देखील यामागील एक कारण मानलं जात आहे.

SL/KA/SL

23 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *