महाराष्ट्रातून या दांपत्याला मिळाला अयोध्यातील राम मंदिर पूजेचा मान..

पनवेल दि १९– रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील खारघर येथे राहत असलेले विठ्ठल दुधाप्पा कांबळे आणि त्यांची पत्नी उज्ज्वला विठ्ठल कांबळे या दाम्पत्याला २२ जानेवारी रोजी होत असलेल्या राममूर्ती प्राणप्रतिष्ठा पूजेचे आमंत्रण मिळाले आहे.
या राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा पूजेचे आमंत्रण हे अनपेक्षित मिळालेले असल्याने विठ्ठल दुधाप्पा कांबळे आणि त्यांची पत्नी उज्ज्वला विठ्ठल कांबळे यांना अत्यानंद झाला असून त्यांनी त्याचे श्रेय केलेल्या चांगल्या कर्माचे फळ असल्याचे ते म्हणतात.
विठ्ठल दुधाप्पा कांबळे हे गेली कित्येक वर्षांपासून आर एस एस चे काम नित्य नेमाने करत असून राम मंदिरामध्ये होत असलेल्या राममूर्ती प्राणप्रतिष्ठा पूजेच्या प्रसारासाठी त्यांनी मुंबई ते गोव्यापर्यंत प्रचार केला होता.
ML/KA/PGB 19 Jan 2024