शेअर बाजाराचे व्यवहार शनिवारीही सुरुच

 शेअर बाजाराचे व्यवहार शनिवारीही सुरुच

मुंबई, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शनिवारी 20 जानेवारी रोजी बीएसई आणि एनएसई दोन लहान सत्रांमध्ये काम करतील. पहिले विशेष सत्र प्राथमिक साइटवर असेल. या सत्रात बीएसई आणि एनएसईचे प्री-ओपन सत्र सकाळी 9 वाजता सुरू होईल. यानंतर सामान्य बाजार सकाळी 9:15 वाजता उघडेल आणि 10 वाजता बंद होईल.दुसरे लाईव्ह सत्र डिजास्टर रिकवरी साइटवर असेल. या अंतर्गत, डिजास्टर रिकवरी साइटवरवर प्री-ओपनिंग सत्र सकाळी 11:15 वाजता सुरू होईल. शनिवारी आणि रविवारी शेअर बाजार बंद असतात पण यावेळी इतिहासात पहिल्यांदाच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) शनिवारी 20 जानेवारी रोजी सुरु राहणार आहे.

सेबी नवीन वर्षात डिझास्टर रिकव्हरी (DR) साइटची चाचणी घेत आहे. स्टॉक एक्स्चेंज साइटवर सायबर हल्ला झाल्यास किंवा साइट क्रॅश झाल्यास, अशा प्रतिकूल परिस्थितीत कोणत्याही व्यत्यय किंवा अडथळाशिवाय व्यापार सुरू ठेवण्यासाठी ट्रेडिंग डिझास्टर रिकव्हरी साइटवर हलविले जाईल. शेअर बाजारात स्थिरता आणणे आणि गुंतवणूकदारांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करणे हा त्याचा उद्देश आहे.

दोन्ही एक्सचेंजेस एका दिवसासाठी डिजास्टर रिकवरी साइटवर स्विच करत आहेत.या साइटच्या चाचणीसाठी बाजार सुरु असणार आहे. काही तांत्रिक बिघाडामुळे साइट क्रॅश झाली तरी व्यापार सुरू ठेवता यावा यासाठी ही व्यवस्था केली जात आहे. 20 जानेवारी रोजी दोन्ही एक्सचेंजवर एक विशेष सत्र आयोजित केले जात आहे.क्लोजिंग सेशन सत्र दुपारी 12:50 वाजता संपेल. दुपारी 1 वाजता बाजार बंद होण्याची घंटा ऐकू येईल. फ्युचर्स आणि ऑप्शन्स विभागामध्ये, मार्केट सकाळी 9:15 वाजता उघडेल आणि प्राथमिक साइटवर सकाळी 10 वाजता बंद होईल. डिजास्टर रिकवरी साइटवर ,ते सकाळी 11:30 वाजता उघडेल आणि दुपारी 12:30 वाजता बंद होईल.

SL/KA/SL

19 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *